Chandrashekhar Bavankule यांची ‘विद्वत्ता’ समोर आलीय; ‘त्या’ वक्तव्यावरून नाना पटोलेंनी साधला निशाणा

Chandrashekhar Bavankule यांची ‘विद्वत्ता’ समोर आलीय; ‘त्या’ वक्तव्यावरून नाना पटोलेंनी साधला निशाणा

Chandrashekhar Bavankule Criticize By Nana Patole : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या (Chandrasekhar Bawankule) पत्रकारांबाबतच्या वक्तव्यावर कॉंग्रेस प्रदेशाध्य नाना पटोले यांनी निशाणा साधला आहे. ते पत्रकारांशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी ही टीका केल्याचं पाहायला मिळालं.

Siddharth Jadhav: सिद्धार्थचा ‘आता होऊ दे धिंगाणा २’ लवकरच येणार भेटीला; Promo Viral

काय म्हणाले नाना पटोले?

आगामी वर्षभरात पत्रकारांनी आपल्या विरोधात एकही बातमी छापू नये. यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या (Chandrasekhar Bawankule) पत्रकारांबाबत एक धक्कादायक वक्तव्य केलं. त्यावर टीका करताना पटोले म्हणाले की, या वक्तव्यावरून बावनकुळेंची विद्वत्ता काय आहे? हे समोर आलं आहे. त्यांनी पत्रकारांना चहा पाजा आणि धाब्यावर न्या असे म्हंटले. भाजपने पत्रकारांचे अवमूल्यन केले आहे.

नगरकरांनो सावधान! नगर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा

चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य नेमकं काय?

आगामी वर्षभरात पत्रकारांनी आपल्या विरोधात एकही बातमी छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा, ढाब्यावर न्या, चहा प्यायला बोलवायचे म्हणजे समजलेच असेल तुम्हाला, असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी अहमदनगरमध्ये बोलताना दिला. दैनिक लोकमतने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Kiran Mane Post: ‘अखेर स्वप्न सत्यात उतरलं.. ‘,किरण माने यांनी खरेदी केली आलिशान कार

बावनकुळे यांच्या उपस्थितीत रविवारी (दि. 24) अहमदनगर शहरातील सावेडी येथील माऊली सभागृहात महाविजय 2024 विधानसभा पदाधिकाऱी संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बावनकुळे म्हणाले, महाविजय 2024 पर्यंत बूथच्या संदर्भात एकही बातमी विरोधात येणार नाही याची काळजी घ्या, सर्व सकारात्मक बातम्या आल्या पाहिजेत, हे बघा. ज्या बूथवर तुम्ही काम कराल तेथे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे लोक कोण आहेत, पोर्टलवाले कोण आहेत, हे पाहावं. आपण एवढं चांगलं काम करतोय, पण हे असं काही टाकतात की जणू गावात बॉम्बच फुटला.

दरम्यान त्यानंतर बावनकुळे यांनी आपल्या या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत सारवासारव करण्याचा प्रयत्न देखील केला. ते म्हणाले, मी म्हटलं, चुकीच्या बातम्या येऊ नये. बऱ्याचदा माहिती नसतांना पत्रकारांकडून बातम्या दिल्या जातात. तुम्ही निगेटिव्ह बातम्या छापा. पण त्यात आमचंही मत येऊ द्या. पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी संवाद ठेऊन पक्षाची भूमिका सांगावी, त्यात गैर काय आहे? नाहीतर एकतर्फी बातम्या येतील. पक्षाविषयी चुकीच्या बातम्या छापल्या जाऊ नये, एवढाच त्या वक्तव्याचा हेतू होता. मात्र, त्याचा विपर्यास केला जातो, असं बावनुकळे म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube