Kiran Mane Post: ‘अखेर स्वप्न सत्यात उतरलं.. ‘,किरण माने यांनी खरेदी केली आलिशान कार

Kiran Mane Post: ‘अखेर स्वप्न सत्यात उतरलं.. ‘,किरण माने यांनी खरेदी केली आलिशान कार

Kiran Mane Post: अभिनेते किरण माने (Kiran Mane) ‘बिग बॉस (Bigg Boss fame) मराठीमुळे जोरदार चर्चेत आला होता. (Social media) तसेच ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या सिरियलमधून खरंतर ते प्रत्येकाच्या घराघरात पोहोचले होते. त्यांना अनेक काम देखील मिळू लागली आहे. (Kiran Mane New Car) प्रसिद्धी झोतात आले असलेले किरण माने नेहमी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टने चाहत्यांची मने जिंकत असल्याचे बघायला मिळत असतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kiran Mane (@kiranmaneofficial)


तसेच अभिनेते किरण माने यांनी आपल्या दमदार अभिनयाने मराठी मनोरंजनसृष्टीमध्ये एक अनोखं स्थान निर्माण केलं आहे. आपल्या खेळातून प्रक्षेकांनी जातं मनं जिंकून घेतली. किरण माने सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. सध्या किरण माने आता एका वेगळ्या कारणाने जोरदार चर्चेत आले आहेत. किरण माने यांनी नुकतीच एक नवीकोरी आलिशान अशी गाडी खरेदी केली आहे.

इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्यांनी त्यांच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहेत. किरण मानेंनी आपल्या नव्या गाडीचे फोटो सध्या इन्स्टाग्रामवर शेअर केल्याचे बघायला मिळत आहे. मर्सिडीज गाडी घेण हे त्यांच लहानपणापासून स्वप्न असल्याचे त्यांनी या पोस्टमध्ये सांगितले आहे. आणि अखेर हे स्वप्न आता सत्यामध्ये उतरलं असल्याचे दिसत आहे. तसेच किरण माने यांनी नव्या कोऱ्या मर्सिडीज गाडीचा फोटो शेअर करत सांगितले आहे की, मित्रांनो ही मोठी गोष्ट नाही. परंतु मला तुम्हाला हे सांगायच आहे.

Shilpa Shetty: ‘सुखी’ मध्ये शिल्पाच्या अभिनयाने प्रेक्षकांना केलं थक्क

जेव्हा मी अल्पवयात होतो, त्यावेळेस मर्सिडीज बेन्झ घेण माझं एक स्वप्न होतं. आणि आता ते स्वप्न सत्यात उतरलं असल्याचे दिसत आहे. माझ्या प्रिय मर्सी आमच्या कुटुंबामध्ये तुझं स्वागत आहे. अशी पोस्ट किरण मानेंनी यावेळी केली आहे, यावर चाहते देखील मोठ्या प्रमाणामध्ये कमेंट करत असल्याचे दिसत आहेत. अनेकांनी त्यांचं अभिनंदन देखील केलं आहे. किरण माने यांच्या कामाविषयी सांगायचं झालं तर, ते सध्या ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘सिंधुताई माझी माई’ या सिरियलमधून चाहत्यांचे मनोरंजन करत असल्याचे बघायला मिळत आहे. या सीरियलमध्ये त्यांनी सिंधुताईंचे वडील अभिमान साठे यांची भूमिका त्यांनी यावेळी साकारली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube