Operation Sindoor : पहलगाम येथील दहशतवादी हल्ला पाकिस्तानला चांगलाच महागात (OPeration Sindoor) पडला आहे. भारताने बुधवारी मध्यरात्रीच थेट पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे अड्डे (India Pakistan Tension) उद्धवस्त केले. फक्त पीओकेच नाही तर थेट पाकिस्तानात 100 किलोमीटर (Pahalgam Terror Attack) आत घुसून हल्ले केले. हे भारताच्या ऑपरेशन सिंदूरचं खास वैशिष्ट्य. पण, ही एअर स्ट्राइक करण्याआधी भारताने 15 अशा कठोर कारवाया केल्या ज्यामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं. या कारवाया कोणत्या होत्या याची थोडक्यात माहिती घेऊ या..
पहलगाम हल्ला झाल्यानंतर सर्वात आधी भारताने सिंधू पाणीवाटप करार (Indus Water Treaty) स्थगित केला. यामुळे पाकिस्तानात पाण्याचं संकट निर्माण झालं. सिंधू नदीच्या पाण्याच्या माध्यमातून पाकिस्तानातील 17 कोटी लोकांना पाणी मिळत होते. भारताच्या या निर्णयाविरुद्ध पाकिस्तान यूएनमध्ये जाण्याची तयारी करत आहे.
भारताने पाकिस्तानबरोबर सर्व प्रकारचा व्यापार बंद केला. पाकिस्तान मार्गे भारताचे साहित्य तर येत आहे पण भारतमार्गे पाकिस्तानचा व्यापार पूर्ण ठप्प झाला आहे. यामुळे पाकिस्तानला कोट्यावधींचे नुकसान झाले आहे.
भारताने दोन दिवसांपूर्वी चिनाब नदीचे पाणी रोखले. यामुळे पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. पाकिस्तानातील नद्या ओढे कोरडे पडण्यास सुरुवात झाली आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी भारताने कुटनितीचा वापर केला. याचाच परिणाम म्हणून आज जगात चीन आणि तुर्की वगळता एकही देश पाकिस्तानच्या समर्थनासाठी उभा नाही. चीननेही तळ्यात मळ्यात धोरण घेतले आहे.
भारताने पाकिस्तानच्या सर्व प्रकारच्या आयात व्यापारावर बंदी घातली आहे. यामुळेही पाकिस्तानचा जळफळाट झाला आहे. पाकिस्तानातून भारतात टरबूज, खरबूज, सिमेंट, सैंधव मीठ, सुकामेवा, चूना, कॉटन, स्टील, चष्म्यांचे ऑप्टिक्स अशा वस्तू येत होत्या.
Live : ऑपरेशन सिंदूर! फक्त 25 पाकिस्तानचा खेळ खल्लास; पत्रकार परिषदेत सैन्यानं सगळं सांगितलं
भारताने पाकिस्तानच्या टपाल, पार्सल सेवेवरही बंदी घातली. यामुळे पाकिस्तानला मोठा झटका बसला. इतिहासात पहिल्यांदाच टपाल सेवा बंद करण्यात आली.
भारताने आणखी कठोर पावले उचलत पाकिस्तानच्या जहाजांना भारतात प्रवेश नाकारला. पाकिस्तानी जहाज भारत मार्गे बांग्लादेशात विविध वस्तू घेऊन जात होते. आता हा मार्ग बंद करून भारताने पाकिस्तानचा व्यापारच बंद केला.
भारताने पाकिस्तानच्या सर्व सैन्य सल्लागारांना देशातून बाहेर काढले. या निर्णयामुळे दोन्ही देशांतील तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला गेला.
भारताने पाकिस्तानात झेलम नदीचे पाणी सोडून दिले. या निर्णयामुळे पाकिस्तानातील मुजफ्फराबाद भागात पूर परिस्थिती निर्माण झाली. लोकांना घर सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घेणे भाग पडले.
संयुक्त राष्ट्रसंघात पाकिस्तानला एकटे पाडण्याचा प्लॅन भारताने यशस्वी केला. 5 मे रोजी यूएनच्या बैठकीत पाकिस्तानला कोणाचाच पाठिंबा मिळू शकला नाही. उलट सुरक्षा परिषदेच्या सदस्यांनी पाकिस्तानलाच काही टोचणारे सवाल केले ज्यामुळ पाकिस्तानी सदस्यांची बोलतीच बंद झाली.
पाकिस्तानच्या समर्थनासाठी मुस्लीम देशही ठामपणे उभे राहिले नाहीत. मुस्लीम देशांच्या ओआयसी या संघटनेने पाकिस्तानच्या बाजूने एक निवेदन देण्यापलीकडे ठोस भूमिका घेतली नाही.
भारताने दिल्लीतील सर्व देशांच्या राजदूतांना बोलावून घेतले. पाकिस्तानच्या या कृत्यांची त्यांना माहिती दिली. याचा परिणाम असा झाला की टिव्ही डिबेटपासून बंद खोलीतील बैठकीपर्यंत सगळीकडेच पाकिस्तानची कोंडी झाली.
भारताकडून पाकिस्तानवर ‘ऑपरेशन सिंदूर’; मोठा शत्रू हाफिज सईद अन् मसूद अजहरचा खात्मा?
भारताने 14 दिवसांपर्यंत पाकिस्तानला दडपणाखाली ठेवले. यामुळे मार्केटमध्ये या देशाची अवस्था आणखी वाईट झाली. तणावामुळे कराची स्टॉक एक्सचेंजचा शेअर बाजार सातत्याने घसरणीत राहीला.
भारताने पाकिस्तान बॉर्डरवरील सलाल आणि बगलियार धरणे बंद केली. या धरणांद्वारेच पाकिस्तानला पाणी मिळत होते. या पाण्याच्या माध्यमातून पाकिस्तान वीज आणि पिण्याच्या पाण्याची गरज भागवत होता.
भारताने पाकिस्तानवर बुधवारी मध्यरात्री थेट एअर स्ट्राइक केली. या हवाई हल्ल्यात 100 पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले आहेत. हल्ले मोठे होते त्यामुळे मृत्यूच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.