live now
Live : ऑपरेशन सिंदूर! फक्त 25 मिनिटात पाकचा खेळ खल्लास; पत्रकार परिषदेत सैन्यानं काय सांगितलं?

Operation Sindoor : अखेर भारताने पाकिस्तानला त्याची जागा दाखवून दिली आहे. भारताने भारताकडून बुधवार (दि. ७ मे २०२५) रोजी मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्रे डागली. (Sindoor) जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने १५ दिवसांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईत कधी आणि कुठं काय झालं या सर्व गोष्टींची अपडेट मिळेल.
ऑपरेशन सिंदूर! भारताकडून पहगाम हल्ल्याचा बदला, पाकिस्तानवर स्ट्राईक, ९ दहशतवादी तळं उद्ध्वस्त
समोर आलेल्या माहितीनुसार, भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (POK) दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले आहेत. ही तीच ठिकाणे आहेत जिथून भारतावर दहशतवादी हल्ले करण्याचे निर्देश दिले गेले होते. दरम्यान, या हल्ल्यात काय काय नुकसान झालंय, याबाबतची माहिती आणखी समोर आलेली नाही. भारतीय सैन्य दलाकडून ‘ऑपरेशन सिंदूर’ नुसार ही कारवाई करण्यात आली आहे. भारताने केलेल्या या क्षेपणास्त्र हल्ल्यात २ लहान मुलांसह ७ जणांचा मृत्यू झाला आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
भारताचा २५ मिनिटांत २१ ठिकाणांवर हल्ला
ऑपरेशन सिंधूरबद्दल माहिती देताना कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितले की, भारतीय सैन्यानं अवघ्या 25 मिनिटांत 21 दहशतवादी ठिकाणांवर हल्ला करत पाकिस्तानाचा खेळ खल्लास केला. पाकिस्तानवर पहाटे १:०५ वाजण्याच्या सुमारास हल्ला करण्यात आला. या कारवाईत ९ ठिकाणी हल्ले करण्यात आले. ही कारवाई १.०५ ते १.३० या 25 मिनिटात करण्यात आली. ही संपूर्ण कारवाई गुप्तचर माहितीच्या आधारे करत करण्यात आल्याचेही कुरेशी यांनी सांगितले. सर्वप्रथम, सवाई नाला कॅम्पला लक्ष्य करण्यात आले. यात लष्कराने जैश आणि लष्करच्या छावण्यांना लक्ष्य केले. ९ ठिकाणी २१ लक्ष्यांवर हल्ला करण्यात आला. पाकिस्तानमधील ज्या ठिकाणी हल्ला झाला ते ठिकाण सियालकोट आहे. येथील सरजल छावणीवर हल्ला झाला. इथे हिजबुलची एक छावणी असल्याचेही कुरेशी यांनी सांगितले.
-
मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांच्या ठिकाणांनाही लक्ष्य केलं
मार्च २०२५ मध्ये जम्मू आणि काश्मीरमधील चार सैनिक शहीद झाले. त्याला पाकिस्तानमधील एका दहशतवादी छावणीत प्रशिक्षण देण्यात आले होते. मुंबई दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणांनाही लक्ष्य करण्यात आल्याचेही कर्नल सोफिया कुरेशी यांनी यावेळी सांगितले.
-
ऑपरेशन सिंदूरदरम्यान निष्पाप नागरिकांची काळजी घेण्यात आली - कर्नल सोफिया कुरेशी
२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर सुरू करण्यात आले होते. या कारवाईत ९ दहशतवाद्यांचे अड्डे लक्ष्य करून नष्ट करण्यात आले. या कारवाईदरम्यान निष्पाप नागरिकांना इजा होणार नाही याची काळजी घेण्यात आल्याचेही कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितले.
-
पहलगाम हल्ल्यात टीआरएफचा हात
भारताने दहशतवाद संपवण्यासाठी पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले आहे. दहशतवादी जम्मू आणि काश्मीरमधील विकास थांबवू इच्छितात. टीआरएफ ही लष्करशी जोडलेली संघटना आहे. पहलगाम हल्ल्यात टीआरएफचा सहभाग असल्याचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सांगितले.
-
पाकिस्तान हा दहशतवादाचा बालेकिल्ला आहे - विक्रम मिस्री
ऑपरेशन सिंदूरवर भारतीय लष्कराची पत्रकार परिषद सुरू झाली असून, या पत्रकार परिषदेची सुरुवात भारतावरील दहशतवादी हल्ल्याच्या व्हिडिओने करण्यात आली. यात पहलगाममधील हल्लादेखील दाखवण्यात आला होता, ज्यामध्ये २६ लोक मारले गेले होते. व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, एका दशकात दहशतवादी हल्ल्यांमध्ये ३५० भारतीयांचा मृत्यू झाला. या हल्ल्याचा उद्देश विकास आणि प्रगती थांबवून राज्याला मागास करणे हा होता. विक्रम मिस्री म्हणाले, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी टीआरएफने घेतली आहे. हल्लेखोरांचीही ओळख पटली आहे. आमच्या गुप्तचर यंत्रणेने हल्ल्यात सहभागी असलेल्या लोकांबद्दल माहिती गोळा केली आहे. या हल्ल्याचा पाकिस्तानशी संबंध आहे. पाकिस्तानला दहशतवाद्यांचे सुरक्षित आश्रयस्थान म्हणून जगभरात मान्यता मिळाली आहे.
-
9 ठिकाणी झाला हल्ला, दहशतवाद्यांचे अड्डे लक्ष्य
बहावलपूर हे जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेपासून सुमारे 100 किमी अंतरावर आहे.
मुरीदके सांबाच्या समोरील सीमेपासून 30 किमी आत लष्कर-ए-तैयबा कॅम्प. 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवादी येथूनच आले होते
गुलपूर हे पूंछ-राजौरीपासून नियंत्रण रेषेच्या आत 35 किमी अंतरावर आहे. 20 एप्रिल 2023 रोजी पूंछ येथे झालेला हल्ला आणि जून 2024 मध्ये प्रवासी बसवरील हल्ला यांचे मूळ येथेच आहे.
पीओजेकेच्या तंगधार सेक्टरमध्ये 30 किमी आत लष्कर कॅम्प सवाई.
बिलाल कॅम्प हे जैश-ए-मोहम्मदचे लाँचपॅड आहे.
राजौरीच्या समोर नियंत्रण रेषेच्या आत 15 किमी अंतरावर लष्कर कोटली कॅम्प. लष्कराचे बॉम्बस्फोट प्रशिक्षण केंद्र, 50 दहशतवाद्यांची क्षमता.
बरनाला कॅम्प राजौरी समोरील एलओसीच्या आत 10 किमी अंतरावर
सांबा-कठुआच्या समोरील आंतरराष्ट्रीय सीमेच्या आत 8 किमी अंतरावर, सरजल कॅम्प जैश कॅम्प
सियालकोटजवळील आंतरराष्ट्रीय सीमेपासून 15 किमी आत आहे मेहमूना कॅम्प, हिजबुल मुजाहिदीनचे प्रशिक्षण केंद्र आहे.
-
5.45 वाजता: कतार एअरवेजने पाकिस्तानला जाणारी सर्व उड्डाणे रद्द केली.
6.00 वाजता: पाकिस्तानने पुन्हा एकदा युद्धबंदी कराराचे उल्लंघन केले आणि पूंछ-राजौरी सेक्टरमधील भिंबर गली भागात तोफांचा मारा केला.
6.08 वाजता: ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेले सर्व भारतीय वैमानिक आणि लढाऊ विमाने सुरक्षितपणे तळावर परतले.
6.14 वाजता: पाकिस्तानने आपली एअरस्पेस बंद केली.
-
5.27 वाजता: आम्ही भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. अमेरिकेला आशा आहे की हे लवकरच संपेल, असे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्क रुबियो म्हणाले.
-
4.35 वाजता:भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानला जाणारी अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली.
5.04 वाजता: हल्ला झालेल्या नऊ ठिकाणांपैकी चार पाकिस्तानात आणि पाच पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहेत. पाकिस्तानमधील तळांमध्ये बहावलपूर, मुरीदके आणि सियालकोट यांचा समावेश आहे.
-
4.13 वाजता: या हल्ल्यांमध्ये भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही दलांचा वापर करण्यात आला. यामध्ये प्रिसिजन अटॅक वेपन सिस्टीमचा वापर करण्यात आला.
4.32 वाजता: अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी भारताच्या हल्ल्याबाबत पाकिस्तानी एनएसए आणि आयएसआय प्रमुख लेफ्टनंट जनरल असीम मलिक यांच्याशी चर्चा केली.