ऑपरेशन सिंदूर! भारताकडून पहलगाम हल्ल्याचा बदला, पाकिस्तानवर स्ट्राईक, ९ दहशतवादी तळं उद्ध्वस्त

ऑपरेशन सिंदूर! भारताकडून पहलगाम हल्ल्याचा बदला, पाकिस्तानवर स्ट्राईक, ९ दहशतवादी तळं उद्ध्वस्त

Operation Sindoor : या वेळची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. (Sindoor) अखेर भारताने पाकिस्तानला त्याची जागा दाखवून दिली आहे. भारताने भारताकडून बुधवार (दि. ७ मे २०२५) रोजी मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्रे डागली. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने १५ दिवसांनी ही कारवाई केली आहे. पहलगाम हल्ल्यात भारतातील २६ पर्यटकांना गोळ्या घालून मारण्यात आलं होतं.

“भारताच्या हक्काचं पाणी भारतासाठीच आता.., PM मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा

समोर आलेल्या माहितीनुसार, भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (POK) दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले आहेत. ही तीच ठिकाणे आहेत जिथून भारतावर दहशतवादी हल्ले करण्याचे निर्देश दिले गेले होते. दरम्यान, या हल्ल्यात काय काय नुकसान झालंय, याबाबतची माहिती आणखी समोर आलेली नाही. भारतीय सैन्य दलाकडून ‘ऑपरेशन सिंदूर’ नुसार ही कारवाई करण्यात आली आहे. भारताने केलेल्या या क्षेपणास्त्र हल्ल्यात २ लहान मुलांसह ७ जणांचा मृत्यू झाला आहे.

भारत सरकारच्या निवेदनात काय?

या कारवाईत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य करण्यात आलं आहे. याच ठिकाणावरून भारतावर दहशतवादी हल्ल्यांचा कट झाला आणि त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये एकूण ९ ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलं आहे, अशीही माहिती भारत सरकारने आपल्या निवेदनात दिली आहे.

पाकिस्तानची प्रतिक्रिया

भारताच्या हल्ल्याबाबत बोलताना ते म्हणाले की, पाकिस्तानला प्रत्युत्तरादाखल कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार आहे. ‘शत्रूने पाकिस्तानच्या पाच ठिकाणांवर भ्याड हल्ला केला आहे. भारताच्या या हल्ल्याला ‘अ‍ॅक्ट ऑफ वॉर'(युद्धाची कृती) असं म्हटलं जाईल. भारताच्या या हल्ल्याला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार पाकिस्तानला आहे. आणि आम्ही जशास तसे प्रत्युत्तर देत आहोत. संपूर्ण पाकिस्तान लष्करासोबत उभा आहे आणि देशाचं मनोधैर्य मजबूत आहे अशी प्रतिक्रिया पाकिस्तान पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी दिली आहे.

ड्रोन पाडल्याचा पाकिस्तानचा दावा

पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते अहमद शरीफ यांच्या मते ‘पाकिस्तानच्या लष्कराने भारताची दोन विमानं आणि एक ड्रोन पाडला आहे. तसंच, पाकिस्तानचं लष्कर जमिनीवर उतरलं आहे पण ते नेमकं कुठं आहे हे सांगता येणार नाही. पाकिस्तानला स्वतःच संरक्षण करण्याचा अधिकार असून, सध्या ती प्रक्रिया सुरु असल्याचं अहमद शरीफ म्हणाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube