मोठी बातमी! पाकव्याप्त काश्मिरात पॅलेस्टाईनची दहशतवादी संघटना हमासची एन्ट्री?, काय आहे सत्य

मोठी बातमी! पाकव्याप्त काश्मिरात पॅलेस्टाईनची दहशतवादी संघटना हमासची एन्ट्री?, काय आहे सत्य

Pahalgam Terror Attack : भारताची डोकेदुखी वाढवणारी माहिती समोर येत आहे. पाकव्याप्त काश्मिरात पॅलेस्टाईनची दहशतवादी संघटना हमासची एन्ट्री झाल्याची माहिती आहे. लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मदने (Attack) हमासशी काश्मीरमधील कारवायांसाठी हातमिळवणी केल्याची माहिती मिळतेय. विशेष म्हणजे पहलगाम हल्ल्यात आणि इस्रायलमध्ये 7 ऑक्टोबर 2023 या दिवशी झालेल्या हल्ल्यात साम्य असल्याचं दिसून येतंय.

पहलगाम हल्ल्यामागे लष्कर ए तोयबाच्या सैफुल्लासह जैशचा कुख्यात दहशतवादी आणि संस्थापक मसूद अझरचा भाऊ रऊफ असगरही असल्याची शक्यता आहे. सैफुल्ला आणि हमासचा राजनैतिक ब्युरो चीफ खालिद मशाल याची गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये कतारची राजधानी दोहा इथे भेट झाल्याची माहिती मिळतेय. विशेष म्हणजे 5 फेब्रुवारीला पाकव्याप्त काश्मिरातील रावळकोट इथे झालेल्या एका रॅलीत जैश, लष्कर ए तोयबासह हमासचे दहशतवादीही सहभागी होते.

पाकव्याप्त काश्मिरात मदरसे बंद करून तिथल्या विद्यार्थी, मौलवींना AK-47 चालवण्याचं प्रशिक्षण-
पाकिस्तानच दहशतवादाला पोसतो हे काही नवं राहिलेलं नाही. मात्र आता पाकिस्तान किती खालच्या पातळीपर्यंत पडू शकतो याचा ढळढळीत पुरावा हाती लागलाय. पाकव्याप्त काश्मिरात मदरसे बंद करून तिथल्या विद्यार्थी, मौलवींना एके 47 चालवण्याचं प्रशिक्षण दिलं जातंय. एबीपी माझाच्या हाती हा व्हिडीओ लागलाय.

Pahalgam Terror Suspects : पहलगाम हल्ला, दहशतवादी श्रीलंकेत? विमानतळावर शोध मोहीम सुरु

एकीकडे पाकिस्तानने पीओकेतील सर्व मदरसे बंद करून तिथे दहशतवादाचा अभ्यासक्रम सुरू केलाय. नीलम घाटी आणि सुधनोती भागातला हा व्हिडीओ आहे. पाकिस्तानी लष्कराचा कर्नल आसीफ खान याच्या नेतृत्वात हा खुनी खेळ सुरू आहे. 90 च्या दशकातही पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मिरातील स्थानिकांच्या हाती बंदुका देत त्यांना भारताविरोधात वापरलं होतं. पाकिस्तानचे दहशतवादाचे खेळ भारताने वेळोवेळी जगासमोर आणलेत. आता त्यातला हा आणखी एक व्हिडीओ भारताच्या हाती लागलाय.

जम्मू कश्मीर सरकार आणि नॅशल कॉन्फरन्सकडून केंद्र सरकारला पूर्ण पाठिंबा- ओमर अब्दुल्ला
जम्मू कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. बैठकीत पहलगामचा दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीसंदर्भात विस्ताराने चर्चा झाली. पहलगाम हल्ल्यानंतर ज्या उपाययोजना करायच्या आहेत त्यासाठी जम्मू कश्मीर सरकार आणि नॅशल कॉन्फरन्सकडून केंद्र सरकारला जे सहकार्य अपेक्षित आहे ते सगळं सहकार्य करण्यास तयार असल्याचं ओमर अब्दुल्लांनी सांगितलं.

तसंच पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी आणि देशाच्या सुरक्षेच्या मुद्दांवर नॅशनल कॉन्फरन्स केंद्र सरकारच्या पाठीशी असल्याचंही ओमर अब्दुल्लांनी स्पष्ट केलं. अब्दुल्लांच्या भेटीनंतर लगेचच नौदल प्रमुख दिनेश त्रिपाठीही पंतप्रधानांच्या भेटीला आले होते. मात्र पंतप्रधान आणि नौदल प्रमुखांमधील चर्चेचा विषय अद्याप स्पष्ट झालेला नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube