“भारताच्या हक्काचं पाणी भारतासाठीच आता..”, PM मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा

PM Modi on Indus Water Treaty : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत (India Pakistan Tension) चालला आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारत सरकारने अनेक कठोर निर्णय घेतले आहेत. यातच सिंधू पाणीवाटप करार रद्द करण्याचाही निर्णय आहे. हा निर्णय स्थगित झाल्याने पाकिस्तानचा जळफळाट झाला आहे. यातच आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पाकिस्तानला कठोर शब्दांत ठणकावले. भारताच्या हक्काचं पाणी भारतासाठीच उपयोगात येईल असे पीएम मोदी म्हणाले आहेत.
एबीपी न्यूज नेटवर्कच्या एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदी बोलत होते. ते म्हणाले, आधी भारताच्या हक्काचं पाणी भारतला मिळत नव्हतं. पण आता भारताच्या हक्काचं पाणी भारतासाठीच वाहणार, थांबणार आणि भारताच्याच उपयोगात येणार असा निर्धार पीएम मोदींनी यावेळी व्यक्त केला. भारत सरकारने सिंधू पाणीवाटप करार स्थगित केला. त्यानंतर चिनाब नदीचे पाणी देखील रोखले. या घडामोडींनंतर पंतप्रधान मोदींचे हे वक्तव्य समोर आले आहे. यावरून भारत सरकारचे आगामी काळातील धोरण काय असेल याचा अंदाज येतो.
पाकिस्तानचा मोठा निर्णय, डिफेन्स बजेटमध्ये केली 18 टक्यांनी वाढ; जूनमध्ये येणार बजेट
आपल्या देशात वर्षानुवर्षे एक चुकीचा प्रवाह वाहत राहिला. त्याचे मोठे नुकसान देशाला सहन करावे लागले. कोणताही मोठा निर्णय घेण्याआधी जगाला काय वाटेल, आपली खुर्ची राहील की नाही याचा विचार आधी केला जात होता. स्वार्थामुळे मोठे निर्णय आणि मोठे बदल रखडले जात होते असाही एक काळ या देशात होता असे सांगत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.
सन 2014 च्या आधी देशातील बँका पूर्णपणे उद्धवस्त होण्याच्या मार्गावर होत्या. पण आज भारतातील बँकिंग जगात एक मजबूत बँकांमध्ये गणले जाते. देशातील बँका विक्रमी नफा मिळवत आहेत. गुंतवणूकदारांनाही याचा फायदा मिळत आहे. बँकिंग क्षेत्रात आमच्या सरकारने सातत्याने रिफॉर्म केले त्याचा हा परिणाम आहे असे मोदींनी स्पष्ट केलं.
आम्हाला सांगितलं जात होतं की भारत मेकर नाही तर फक्त एक मार्केट आहे. पण आता हा टॅगही हटू लागला आहे. आज भारत जगातील सर्वात मोठा मॅन्यूफॅक्चर देश म्हणून नावारुपास येत आहे. भारताचे डिफेंस प्रोडक्ट 100 पेक्षा जास्त देशांत निर्यात होत आहेत. आज आपल्याकडे आयएनएस विक्रांत, आयएनएस सूरत यांसारख्या युद्धनौका आहेत. या नौका भारताने स्वतःच्या सामर्थ्याने तयार केल्या आहेत असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
मास्टरस्ट्रोक ठरला तोट्याचा! भारताची विमानं बंद, पाकिस्तानला दररोज अडीच कोटींचा फटका