मास्टरस्ट्रोक ठरला तोट्याचा! भारताची विमानं बंद, पाकिस्तानला दररोज अडीच कोटींचा फटका

मास्टरस्ट्रोक ठरला तोट्याचा! भारताची विमानं बंद, पाकिस्तानला दररोज अडीच कोटींचा फटका

India Pakistan Crisis : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध प्रचंड ताणले (India Pakistan Crisis) गेले आहेत. अतिरेक्यांनी पर्यटकांना धर्म विचारुन त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यानंतर भारत सरकारने पाकिस्तान विरुद्ध कठोर निर्णय घेतले. पाकिस्तानी विमानांसाठी हवाई हद्द बंद केली. पाकिस्ताननेही भारताची कॉपी केली. भारतीय विमानांसाठी हवाई हद्द बंद केली. पाकिस्तानी राज्यकर्ते या निर्णयाला मास्टरस्ट्रोक मानत होते. परंतु, हाती आलेल्या ताज्या माहितीनुसार हा निर्णय कंगाल पाकिस्तानची तिजोरी आणखी रिकामा करणारा ठरला आहे.

खरंतर 24 एप्रिलच्या आधीपर्यंत पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून दररोज 100 ते 150 भारतीय विमान ये जा करत होती. या मोबदल्यात पाकिस्तानला (Pakistan News) दररोज 87 हजार 500 अमेरिकी डॉलर (2.45 कोटी पाकिस्तानी रुपये) मिळत होते. परंतु, पाकिस्तानने स्वतःच उत्पन्न मिळण्याचा मार्ग बंद केला.

पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी आपली हवाई हद्द बंद केल्यापासून आतापर्यंत पाकिस्तानला जवळपास 17.20 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. भारतीय विमानांना मार्ग बदलल्याने पाकिस्तानचा एअर स्पेस रिकामा झाला आहे. दुसरीकडे पाकिस्तानी निर्बंधांचा विचार न करता भारताने दोन नवीन मार्ग सुरू केले आहेत. रस्ता बदलल्याने भारतीय विमान कंपन्यांच्या खर्चात थोडी वाढही झाली आहे.

भारतासोबत युद्ध झाल्यास…खिसेकापू अन् चोरांपासून कोण वाचवणार? पाकिस्तानला वेगळंच टेन्शन

कंगाल पाकिस्तान आता काय करणार

पाकिस्तानची हवाई हद्द बंद झाल्याने भारतीय विमानांना अन्य पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे. यामुळे विमान कंपन्यांच्या खर्चात थोडी वाढ झाली आहे. परंतु, हा खर्च सहन करण्याची विमान कंपन्यांची क्षमता आहे. पण पाकिस्तानची मात्र तशी क्षमता नक्कीच नाही. भारतीय विमानांचे ये जा थांबल्याने पाकिस्तानला रोज कोट्यावधींच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागत आहे. हा तोटा कसा भरून काढायचा असा प्रश्न पाकिस्तानसमोर आहे.

भारतीय हवाई हद्द पाकिस्तानी विमानांसाठी बंद झाली आहे. तरी भारताला फारसा फरक पडलेला नाही. आजही पाहिले तर भारतीय हवाई हद्दीत विमानांचे जाळे दिसून येत आहे. दुसरीकडे पाकिस्तानच्या एअर स्पेसमध्ये (Air Space) मात्र एखाद दुसरेच विदेशी विमान दिसत आहे.

कंगाल पाकिस्तानचे मंत्री मालामाल, पगारात घसघशीत वाढ; मिळणार ‘इतका’ पगार

भारत पाकिस्तान तणाव वाढला

पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशांतील तणाव प्रचंड वाढला आहे. वाढलेला तणाव पाहता पाकिस्तानने सीमेजवळ नवीन डेपो तयार करण्याचे काम सुरू केले आहे. पण दारूगोळच नाही तर अशा डेपोंचे कोणतेही रणनितिक महत्व नाही असे जाणकारांचे म्हणणे आहे. पाकिस्तानने त्यांच्याकडील हत्यारे दुसऱ्या देशांना दिली आणि आता स्वतः कंगाल झाला आहे. आर्थिक फायदा होण्यासाठी हा निर्णय घेतला गेला होता पण या निर्णयामुळे पाकिस्तानचे दीर्घकालीन रणनितिक नुकसान झाले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube