कंगाल पाकिस्तानचे मंत्री मालामाल, पगारात घसघशीत वाढ; मिळणार ‘इतका’ पगार

Pakistan News : पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान (India Pakistan Tension) यांच्यातील तणाव प्रचंड वाढला आहे. भारत केव्हाही हल्ला करील या भीतीने पाकिस्तानी नेत्यांची (Pakistan News) झोप उडाली आहे. मात्र तरीही या लोकांनी आपले खिसे भरण्याचे काम चोख बजावले आहे. पाकिस्तान सरकारमधील मंत्र्यांच्या पगारात घसघशीत वाढ करण्यात आली आहे. 1 जानेवारी 2025 पासूनच नवी पगारवाढ लागू करण्यात आली आहे. फेडरल मंत्र्यांचे मानधन 2 लाख 18 हजार रुपयांवरून थेट 5 लाख 19 हजार रुपये करण्यात आले आहे. नॅशनल असेंबलीचे स्पीकर आणि डिप्टी स्पीकर यांच्या पगारात मात्र कोणतीही वाढ झालेली नाही.
पाकिस्तानच्या राष्ट्रपतींनी वेतन, भत्ते आणि विशेषाधिकार अधिनियम 1975 मध्ये संशोधन करणारा एक अध्यादेश जारी केला आहे. पगारवाढीनंतर पाकिस्तानी मंत्री आणि खासदारांच्या खात्यात जवळपास 5 लाख 19 हजार रुपये जमा होणार आहेत. या वर्षातील जानेवारी महिन्यात पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी खासदारांच्या पगारात वाढ करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली होती.
या निर्णयाचा फायदा मंत्र्यांसह खासदारांनाही होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानातील पंजाब विधानसभेतील आमदार, प्रांतीय मंत्री, स्पीकर, डिप्टी स्पीकर, संसदीय सचिव आणि अन्य अधिकाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पंजाब विधानसभेने 16 डिसेंबर 2024 रोजी Punjab Revision of Salaries of Public Representatives Bill 2024 पारित केले होते. यात आमदार आणि मंत्र्यांच्या पगार घसघशीत वाढ केली होती.
1 लाखांवरून थेट 9 लाख
विधानसभा सदस्यांना याआधी 76 हजार रुपये मिळत होते. पगारवाढीनंतर त्यांना तब्बल 4 लाख रुपये मिळू लागले आहेत. मंत्र्यांच्या पगारात तब्बल 860 टक्के वाढ करण्यात आली. मंत्र्यांना आधी 1 लाख रुपये पगार मिळत होता तो आता 9 लाख 60 हजार रुपये झाला आहे. स्पीकरला दर महिन्याला 1 लाख 25 हजार रुपये मिळत होते. त्यात वाढ होऊन आता 9 लाख 50 हजार रुपये मिळत आहेत. तसेच डिप्टी स्पीकरला आधी 1 लाख 20 हजार रुपये पगार मिळत होता. आता त्याला 7 लाख 75 हजार रुपये पगार मिळत आहे.
भारत पाकिस्तान तणाव वाढला
पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशांतील तणाव प्रचंड वाढला आहे. वाढलेला तणाव पाहता पाकिस्तानने सीमेजवळ नवीन डेपो तयार करण्याचे काम सुरू केले आहे. पण दारूगोळच नाही तर अशा डेपोंचे कोणतेही रणनितिक महत्व नाही असे जाणकारांचे म्हणणे आहे. पाकिस्तानने त्यांच्याकडील हत्यारे दुसऱ्या देशांना दिली आणि आता स्वतः कंगाल झाला आहे. आर्थिक फायदा होण्यासाठी हा निर्णय घेतला गेला होता पण या निर्णयामुळे पाकिस्तानचे दीर्घकालीन रणनितिक नुकसान झाले आहे.
पाकिस्तानला हादरवणारी बातमी! ‘या’ शहरातील इमारतींवर बलूच बंडखोरांचा कब्जा; काय घडलं?