VIDEO : सिंधू पाणी करार स्थगित; तुम्ही पाणी कुठे घेऊन जाणार आहात? मौलाना अरशद मदनी यांचं वादग्रस्त विधान

Arshad Madani On Indus River Water Treaty suspended : पहलगाम हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) भारताने पाकिस्तानविरुद्ध कडक कारवाई केली आहे. सिंधू नदी पाणी करार (Indus River Water) स्थगित केला आहे. या मुद्द्यावर बोलताना जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना अरशद मदनी यांचा संयम सुटल्याचं दिसतं आहे. जमियतचे अध्यक्ष मौलाना अर्शद मदनी म्हणाले की, नद्या हजारो वर्षांपासून वाहत आहेत. तुम्ही त्यांचे पाणी कुठून घेणार? नियम प्रेमाचा (India Pakistan Tension) असावा, असंही त्यांनी म्हटलं आहे. यानंतर त्यांनी भारतातील मुस्लिमांच्या स्थितीवर वादग्रस्त विधान केले.
सिंधू पाणी करार स्थगित करण्यात आलाय. यावर जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष अरशद मदनी यांनी म्हटलंय की, जर कोणी पाणी थांबवले, तर त्यांना ते थांबवू द्या. या नद्या हजारो वर्षांपासून वाहत आहेत, तुम्ही त्यांचे पाणी कुठे घेऊन जाणार (Arshad Madani Controversial Statement) आहात? हे सोपे नाही. मला वाटते की, नियम प्रेमाचा असावा, द्वेषाचा नाही. मी एक मुस्लिम आहे, मी माझे आयुष्य या देशात घालवत आहे आणि मला माहित आहे की, येथे ज्या गोष्टींचा प्रचार केला जात आहे, त्या देशासाठी योग्य नाहीत.
….तर त्यात बापाची काय चूक? दहशतवाद्याचं घर पाडण्यास फारूख अब्दुल्लांचा विरोध
आम्ही देखील मुसलमान आहोत. ज्या गोष्टींना प्रोत्साहन दिलं जातंय, ते त्यांच्यासाठी (भारतासाठी) देखील हानीकारक आहे. जर अशाच प्रकारे द्वेषाचे राजकारण सुरू राहिले, तर असा दिवस उगवेल की, श्वास घेणं देखील अवघड होईल, असा इशारा देखील मौलाना अरशद मदनी यांनी दिला आहे. देश तर प्रेम आणि प्रेम आणि आपुलकीने जिवंत राहतो. ज्याने प्रेम आणि आपुलकीला आग लावली, समजून जा त्याने देशाला आग लावली, असं देखील अरशद मदनी यांनी म्हटलंय.
माझे अंघोळ करतानाचे व्हिडिओ…करुणा शर्मांचा आणखी एक खळबळजनक आरोप, प्रकरण नेमकं काय?
भारत आणि पाकिस्तानमध्ये खूप तणाव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे सांगितलंय की, पहलगाममधील हल्लेखोर आणि त्यांच्या आकांना सोडले जाणार नाही. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाची परिस्थिती कायम आहे. या सगळ्यामध्ये वादग्रस्त विधानेही येऊ लागली. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, महाराष्ट्र काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि चरणजीत सिंह चन्नी यांनी वादग्रस्त विधाने केली आहेत. आता मौलाना अरशद मदनी यांच्या विधानामुळे राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.