India Airstrike In Pakistan Operation Sindoor : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला (Pahalgam Terror Attack) प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने दहशतवादाविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. एका संयुक्त मोहिमेअंतर्गत, भारताच्या तिन्ही सैन्याने पाकिस्तानमध्ये असलेल्या एकूण 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करून कारवाई केली (India Airstrike In Pakistan) आहे. अहवालानुसार या हल्ल्यात सुमारे 90 दहशतवादी मारले गेले आहेत. भारताने या कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव दिले आहे.
भारत सरकारने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, या कारवाईत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आलंय. जिथून भारतावर दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन केले जात (Operation Sindoor) होते. दुसरीकडे, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताने केलेल्या हवाई हल्ल्याला ‘कायर’ म्हटलंय.
Operation Sindoor UPDATES: Here is the list of nine terror facility locations in Pakistan and Pakistan-occupied Kashmir that have been successfully neutralised-
1. Markaz Subhan Allah, Bahawalpur – JeM
2. Markaz Taiba, Muridke – LeT
3. Sarjal, Tehra Kalan – JeM
4. Mehmoona Joya,… pic.twitter.com/Q3Q6vyw0Sa— Press Trust of India (@PTI_News) May 7, 2025
भारताकडून पाकिस्तानवर ‘ऑपरेशन सिंदूर’; मोठा शत्रू हाफिज सईद अन् मसूद अजहरचा खात्मा?
ऑपरेशन सिंदूर ही भारतीय सशस्त्र दलांनी 7 मे 2025 रोजी सुरू केलेली एक ऐतिहासिक लष्करी कारवाई होती, यामध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील जैश-ए-मोहम्मद (जेईएम) च्या नऊ दहशतवादी अड्ड्या नष्ट करण्यासाठी विशेष दारूगोळा वापरण्यात आला. 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली.
दहशतवादाविरुद्ध मोठी कारवाई करत भारताने मंगळवारी रात्री साडे नऊ वाजता 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला. या हल्ल्याला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले आहे. हे तिन्ही सैन्यांचे संयुक्त ऑपरेशन आहे. भारताच्या बलाढ्य सैन्याने पाकिस्तानमधील 4 आणि पीओकेमधील 5 ठिकाणांना लक्ष्य केलंय.
मॉक ड्रिलमध्ये सायरन का वाजवले जातात? एका क्लीकवर जाणून घ्या सर्व प्रश्नांची उत्तरे
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला आहे. भारताच्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये 90 दहशतवादी ठार झाले आहेत. बहावलपूर आणि मुरीदके या दोन सर्वात मोठ्या ठिकाणी सुमारे 25 ते 30 दहशतवादी मारले गेले. भारतीय एजन्सी इतर दहशतवादी छावण्यांमध्ये असलेल्या संख्येची पुष्टी करत आहेत.
हरियाणा आणि पंजाबमधील सर्व हवाई तळांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या पंजाबमधील सर्व सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पठाणकोट जिल्हा प्रशासन देखील सतर्क आहे. उपायुक्तांनी पुढील 72 तासांसाठी सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.