Pahalgam terror attack : भारताचा पाकला मोठा झटका ! सर्व वस्तूंच्या आयातीवर घातली बंदी

Pahalgam terror attack : भारताचा पाकला मोठा झटका ! सर्व वस्तूंच्या आयातीवर घातली बंदी

India Bans All Imports From Pakistan: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam terror attack) भारताने (India) पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) आणखी एक कठोर पाऊल उचलले आहे. पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व आयातीवर (Imports) भारताने बंदी घातलीय. हा निर्णय पाकिस्तानमधून येणाऱ्या सर्व उत्पादनांना लागू होतो. राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक धोरणाच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असे केंद्र सरकारने जाहीर केले आहे.

राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक धोरणाच्या हितासाठी हे निर्बंध लादण्यात आलेत. या निर्बंधाला अपवाद वगळता वस्तूंच्या निर्यातीसाठी भारत सरकारची पूर्व परवानगी आवश्यक असेल, असे वाणिज्य मंत्रालयाच्या अधिसूचनेत म्हटलंय. पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील एकमेव व्यापार मार्ग असलेला वाघा-अटारी क्रॉसिंग आधीच बंद करण्यात आला होता.


पाकिस्तानातून भारतात काय आयात होते ?

पाकिस्तानमधून होणाऱ्या आयातीत प्रामुख्याने औषधी उत्पादने, फळे आणि तेलबियांचा समावेश आहे. 2019 च्या पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी उत्पादनांवर दोनशे टक्के शुल्क लादल्यानंतर गेल्या काही वर्षांत त्यात घट झालीय. 2024-25 मध्ये एकूण आयातीच्या 0.1 पेक्षा कमी असल्याचे अहवालात म्हटलंय. 22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील निसर्गरम्य बैसरन हॅलीमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यात 28 भारतीयांचा मृत्यू झाला आहे. या दहशतवादी हल्ल्यात पाकचा संबंध आढळून आले. त्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडले आहेत.

पहलगाम हल्ल्यानंतर 1960 मध्ये दोन्ही देशांनी स्वाक्षरी केलेला सिंधू पाणी करार भारताने रद्द केलाय. भारताने पाकिस्तानी नागरिकांचे सर्व व्हिसा देखील रद्द केलेत. त्यामुळे पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडावा लागला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube