पंतप्रधानपदासाठी खर्गेंचं नाव; संयोजकांचा अद्याप निर्णय नाही, नेत्यांमध्ये धुसफूस सुरु

India Alliance Meeting : पंतप्रधानपदासाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांचं नाव पुढे आलं आहे. इंडिया आघाडीच्या चौथ्या बैठकीत याबाबत खर्गे यांचं नाव समोर आलं असून या बैठकीनंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) आणि आरजेडीचे लालूप्रसाद यादव (Laluprasad yadav) यांच्यात नाराजी पसरल्याचंही सांगण्यात येत आहे. पंतप्रधानपदासाठी खर्गेंचं नाव पुढे आलं मात्र, संयोजक म्हणून […]

India Alliance Meeting

India Alliance Meeting

India Alliance Meeting : पंतप्रधानपदासाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांचं नाव पुढे आलं आहे. इंडिया आघाडीच्या चौथ्या बैठकीत याबाबत खर्गे यांचं नाव समोर आलं असून या बैठकीनंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) आणि आरजेडीचे लालूप्रसाद यादव (Laluprasad yadav) यांच्यात नाराजी पसरल्याचंही सांगण्यात येत आहे. पंतप्रधानपदासाठी खर्गेंचं नाव पुढे आलं मात्र, संयोजक म्हणून अद्याप कोणताही निर्णय न झाल्याने नाराजी पसरल्याचं सांगण्यात आहे.

Eknath Khadase : …तोपर्यंत अजित पवार संघाला समर्थन देणार नाही; खडसेंचा अजितदादांवर ठाम विश्वास

इंडिया आघाडीच्या या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दोन्ही नेते दिसले नाहीत. बैठक संपण्यापूर्वीच नितीश कुमार आणि यादव हे दोन्ही निघून गेल्याचीही माहिती मिळाली आहे. भाजप खासदार गिरीराज सिंह यांनीही या मुद्द्यावरुन विरोधकांवर निशाणा साधला आहे.

Ahmednagar : वाळू धोरणावरुन तनपुरेंनी महसूलमंत्र्याना घेरलं, वाळू वाहतूकदारांकडून लूट…

बैठकीनंतर खासदार महुआ माझी यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, आरजेडीचे खासदार मनोज झाही पुढे आले आहेत. येत्या 20 दिवसांत सर्वकाही सुरू होईल, असेही त्यांनी बैठकीनंतर सांगितले. मात्र, नीतीश कुमार आणि लालू यादव यांना आघाडीचे समन्वयक तर खर्गेंना पंतप्रधानपदाची उमेदवारी देण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे माझी यांनी स्पष्ट केलं आहे.

Ankita Lokhande Birthday: अर्चना ते बिग बॉस अभिनेत्री अंकिता लोखंडेचा असा होता अनोखा प्रवास

इंडिया आघाडीने जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवला असून बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधानपदासाठी आपले नाव पुढे केले असल्याचं मल्लिकार्जुन खर्गेंनी माहिती दिली आहे. तसेच मी वंचितांसाठी काम करतो.

अजितदादांनी फक्त सांगावं, ‘मी’ बारामतीतून लढण्यास तयार… : महादेव जानकरांचा शड्डू

निवडणूक जिंकून बहुमत मिळवणे हे युतीचे पहिले लक्ष्य असेल. त्यानंतर खासदार लोकशाही पद्धतीने निर्णय घेतील. सभेपूर्वी लालू खूप बोलले होते सभेपूर्वी लालू यादव बरेच काही बोलले होते. खर्गेंना यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी प्रश्न विचारताच कोण मोदी? असा प्रतिप्रश्न त्यांनी मीडियाला केला आहे.

Exit mobile version