मुंबई : मोदींविरोधात मोट बांधलेल्या विरोधकांच्या इंडिया आघाडीत (India Alliance) मोठा बदल झाल्याची माहिती समोर आली. त्यानुसार येथून पुढील काळात इंडिया आघाडीच्या होणाऱ्या मोठ्या बैठका होणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने पटना, बंगळुरू त्यानंतर नुकतीच मुंबईत इंडिया आघाडीची बैठका पार पडल्या होत्या. मात्र, येथून पुढे अशा मोठ्या बैठकांचे आयोजन केले जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
Sanjay Raut : ‘मोदींचा वाढदिवस की भाजपचा निरोप समारंभ?’ विशेष अधिवेशनावर राऊतांची खोचक टीका
पवारांच्या घरी ठरणार मास्टर प्लानिंग
दरम्यान, एकीकडे इंडिया आघाडीच्या मोठ्या बैठकांना पूर्णविराम मिळणार असल्याचे सांगितले जात असतानाच येत्या 13 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या दिल्लीतील निवास्थानी बैठक होणार आहे. ही बैठक इंडिया आघआडीच्या समन्वय समितीची असणार आहे, अशी माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली आहे. याच बैठकीत पुढील मास्टर प्लानिंग ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.
नेमलेल्या समित्या करणार बैठका
इंडिया आघाडीच्या मोठ्या बैठकांना जरी पूर्णविराम मिळणार असल्याच्या चर्चा सुरू असल्या तरी दुसरीकडे मुंबईत नेमलेल्या समित्यांमधील नेते बैठका घेत पुढील राणनीतीवर काम करत राहणार आहेत. त्याची सुरूवात येत्या 13 सप्टेंबरपासून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवास्थानापासून होणार आहे. या बैठकीत नेमके काय ठरवले जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Maratha Reservation : मोठी बातमी ! मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांचे पथक दाखल
समन्वय समितीत पवार, राऊतांसह तेरा जणांचा समावेश
इंडिया आघाडीच्या नुकत्याच मुंबईत झालेल्या बैठकीत समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासह तेरा नेत्यांना स्थान देण्यात आले आहे. आगामी निवडणुकीचा विचार करून प्रादेशिक समतोल राखत नेत्यांची निवड करण्यात आली आहे.
India VS Bharat : नरेंद्र मोदींच्या ओळखपत्रावर आले ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’
या समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत, काँग्रेसचे के. सी. वेणुगोपाल, तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आपचे खासदार राघव चड्ढा, जावेद अली खान, डी राजा, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, लाल्लन सिंह, ओमर अब्दुल्ला, महबुबा मुफ्ती या तेरा जणांचा समावेश आहे.