Maratha Reservation : मोठी बातमी ! मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांचे पथक दाखल

Maratha Reservation : मोठी बातमी ! मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांचे पथक दाखल

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळाली आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. मागील आठ दिवसांपासून ते उपोषणावर आहेत. या काळात त्यांच्या पोटात अन्नाचा एक कणही गेलेला नाही. यामुळे आता त्यांची तब्येत बिघडली आहे. आज डॉक्टरांचे पथक उपोषणस्थळी दाखल झाले आहे.

राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने (Maratha Reservation) काल जरांगे यांची भेट घेतली होती. त्यावेळीही त्यांनी आरक्षणाचा जीआर घेऊन आल्याशिवाय उपोषण सोडणार नाही असे स्पष्ट शब्दांत सांगितले होते. त्यामुळे शिष्टमंडळाला रिकाम्या हाताने परतावे लागले. यानंतरही जरांगे यांचे उपोषण सुरुच आहे. आज त्यांच्या उपोषणाचा नववा दिवस आहे. कालपासूनच त्यांना अस्वस्थ वाटत होते. उपोषणामुळे जरांगे यांच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने त्यांना आज सलाईन लावण्यात आले.

‘चोर मंडळातील एक मोदी लंडनच्या पार्टीत’.. ठाकरे गटाची मोदी सरकारवर आगपाखड

राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे यांची भेट घेत त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) सरकार सकारात्मक आहे. यासाठी एक महिन्याचा वेळ द्या असे सरकारच्यावतीने सांगण्यात आले. त्यावर एक महिन्याचा वेळ कशाला हवा, चार दिवसांचा वेळ पुरेसा आहे, अशी भूमिका जरांगे यांनी घेतली आहे. तुम्ही म्हणाल ते करतो आधी जीआर काढा. आम्ही ओबीसीत आहोत. तरी आरक्षणापासून आम्हाला दूर ठेवले. आता चार दिवस देतो. मला अध्यादेश द्या, मला फोनवर कळवा. मी समाजाला शब्द दिला आहे. सरकारला अजून चार दिवस देतो असा अल्टिमेटम जरांगे यांनी दिला.

मी आरक्षण (Maratha Reservation) घेतल्याशिवाय उठणार नाही. गरज भासल्यास सलाइन लावतो, असेही त्यांनी सांगितले होते. मराठा आरक्षणासाठी सरकार तुमच्या पाठिशी आहे. तु्म्ही एक महिन्याचा वेळ द्या, अशी मागणी मंत्री गिरीश महाजन यांनी केली होती. मात्र जरांगे यांनी नकार दिला. त्यानंतर आज उपोषणाच्या नवव्या दिवशी मात्र त्यांची प्रकृती खालावली. वैद्यकिय पथक येथे दाखल झाले आहे. डॉक्टर जरांगे यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहेत.

Jalna Maratha Protest : हा लेकराबाळांचा प्रश्न, आमची फसवणूक करु नका; मनोज जरांगेंचा इशारा

काल माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले होते की, राज्य सरकारचं (Maratha Reservation) शिष्टमंडळ आंदोलनस्थळी आलं होतं. मराठा आरक्षणासंदर्भात आम्ही सकारात्मक असून यावर तोडगा काढण्यासाठी आम्ही पुन्हा उद्या येणार असल्याचं शिष्टमंडळाने सांगितले. उद्या जर शिष्टमंडळ मराठा आरक्षणासंदर्भातील अध्यादेश घेऊन आले नाही तरीही आमरण उपोषण सुरुच राहणार असल्याचं जरांगे यांनी स्पष्ट केले.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube