Jalna Maratha Protest : हा लेकराबाळांचा प्रश्न, आमची फसवणूक करु नका; मनोज जरांगेंचा इशारा

Jalna Maratha Protest : हा लेकराबाळांचा प्रश्न, आमची फसवणूक करु नका; मनोज जरांगेंचा इशारा

Jalna Maratha Protest : मराठा आरक्षणाचा मुद्दा आमच्या लेकराबाळांचा प्रश्न आहे, त्यामुळे फसवणूक करु नका, असा इशाराच मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिला आहे. मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे हे जालन्यातील अंतरवली चराटी गावात आमरण उपोषणाला बसले आहेत. याच आंदोलनात पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केल्याचं समोर आलं. त्यानंतर आता जरांगे यांनी सरकारला चार दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.

राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यासाठी सुप्रीम कोर्टात धाव, ‘तो’ अधिकार लोकसभा अध्यक्षांना नाही

माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज आंदोलनस्थळी आलं होतं, मराठा आरक्षणासंदर्भात आम्ही सकारात्मक असून यावर तोडगा काढण्यासाठी आम्ही पुन्हा उद्या येणार असल्याचं शिष्टमंडळाकडून सांगण्यात आल्याचं जरांगे यांनी सांगितलं आहे, उद्या जर शिष्टमंडळ मराठा आरक्षणासंदर्भातील अध्यादेश घेऊन आले नाही तरीही आमरण उपोषण सुरुच राहणार असल्याचं जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे.

Gautami Patil : नृत्यांगणा गौतमी पाटीलचे वडील ‘या’ कारणाने आले होते चर्चेत

हा मराठा समाजातील तरुण एका टक्क्याने नंबर न लागल्याने टोकाचं पाऊल उचलत आहे, आत्महत्या करीत आहेत, त्यामुळे हे दुख: आता आम्हाला बघवत नाही , आता लेकरांचा हा आक्रोश आम्हाला सहन होत नाही, आमच्या लेकरांबाळांचा प्रश्न असून आमची फसवणूक होऊ नये, उद्यापर्यंत सकारात्मक निर्णय होईल, अशी आशा आम्हाला असल्याचंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी आमचं आमरण उपोषण सुरुच राहणार असून राज्यातील मराठा बांधवांनी आंदोलन करावं तेही शांततेत. कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडेल असं आंदोलन कोणीही करु नये, असं आवाहन जरांगे यांनी यावेळी केलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube