Gautami Patil : नृत्यांगणा गौतमी पाटीलचे वडील ‘या’ कारणाने आले होते चर्चेत

Gautami Patil : नृत्यांगणा गौतमी पाटीलचे वडील ‘या’ कारणाने आले होते चर्चेत

Gautami Patil Father passed away: महाराष्ट्रातील फेमस नृत्यांगणा गोतमी पाटीलच्या (Gautami Patil ) चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. गौतमीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (Gautami Patil Father passed away) गौतमीचे वडील रविंद्र बाबुराव पाटील (Ravindra Baburao Patil) यांचं पुण्यातील हॉस्पिटलमध्ये निधन झालं आहे. सोमवारी ३ वाजेच्या सुमारास गौतमीच्या वडिलांचं निधन झालं आहे. त्यांच्यावर आज पुण्याच्या धनकवडी येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलचे वडील रवींद्र पाटील हे धुळ्यातील सूरत हायवेवर बेवारस आणि बेशुद्धावस्थेत सापडले होते. त्यानंतर धुळ्यातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तात्काळ त्यांना उपचारासाठी धुळ्यातील हिरे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. गौतमीच्या वडिलांची प्रकृती अतिशय गंभीरजनक होती. गौतमीला वडिलांची माहिती मिळताच त्यांच्या मदतीसाठी धावली होती.

Maratha Reservation: जालना लाठीचार्ज प्रकरणी ‘या’ मराठी अभिनेत्रीची संतप्त पोस्ट; म्हणाली, “मराठा आरक्षण…”

फेमस नृत्यांगणा गौतमीचा तिच्या आडनावावरून मध्यंतरी जोरदार वाद पेटला होता. त्यावेळेस तिचे वडील माध्यमांमध्ये झळकले होते. मुलीसोबत राहत नसताना देखील वडिलांनी तिच्या डान्सबद्दल आणि आडनावाविषयी प्रतिक्रिया दिल्याने ते जोरदार चर्चेत आले होते. वृत्तवाहिनीशी संवाद साधत असताना रविंद्र बाबूराव नेरपगारे पाटील म्हणाले होते की, “कौटुंबिक वादातून आम्ही विभक्त झालो. तेव्हापासून गौतमी आणि तिची आई वेगळे राहत असतात. माझ्या घरी टीव्ही नसल्याने मी तिचा डान्स दुसऱ्यांच्या फोनमध्ये बघितला आहे. तिचा डान्स आवडतो, परंतु थोडं वाईट देखील वाटतं.”

माध्यमांशी संवाद साधत असताना गौतमीच्या वडिलांनी आपल्या मुलीवर होणाऱ्या टीकावर थेटच उत्तर दिलं होतं. “टीका करण्याऱ्यांनी तिला अशा पद्धतीने बोलायला नको. मी तिच्या बाजूने आहे. ती काही वाईट करतेय का? टीका करणारे लोक भरपूर असतात. कुणी घोड्यावर बसू नको म्हणतात, तर कुणी पायी चालू नको म्हणतात. लोक काही ना काही टीका करत असतात.” असं स्पष्ट उत्तर देत रविंद्र पाटील यांनी गौतमीवर टीका करणाऱ्यांना खडसावले होते.

लेकीच्या डान्सबद्दल त्यांना आजिबात आक्षेप नव्हता. तसेच गौतमीच्या आडनावावषयी बोलत असताना ते म्हणाले होते, “ती पाटील आहे, तर पाटीलच आडनाव लावणारच ना. यामुळे तिने आडनाव बदलायचा सवालच येत नाही.” यावेळी त्यांनी टीका करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला देखील मुलीला दिला होता. तसेच आपल्या वडिलांना शेवटचं बगण्यासाठी गौतमी पुण्यामध्ये पोहचली होती. यावेळी ती भावुक झाली होती. अंतिम दर्शन घेत तिने वडिलांना शेवटचा निरोप दिला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube