Maratha Reservation: जालना लाठीचार्ज प्रकरणी ‘या’ मराठी अभिनेत्रीची संतप्त पोस्ट; म्हणाली, “मराठा आरक्षण…”
Ashwini Mahangde Post: मराठा आरक्षणाच्या (Maratha Aarakshan ) मागणीकरिता जालन्यातील सराटी येथे आमरण उपोषण करण्यात आलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी (Police) जोरदार लाठीचार्ज केल्याची घटना काल (शुक्रवारी) घडली. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रभर (Maharashtra) पडसाद उमटत असल्याचे बघायला मिळत आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या विरोधामध्ये महाराष्ट्रभर जोरदार संताप व्यक्त केला जात आहे. या संदर्भात मराठी सिरीयल ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री अश्विनी महांगडेने (Ashwini Mahangde) एक संताप जनक पोस्ट यावेळी केली आहे.
गेल्या काही दिवसापासून मराठी कलाकार सामाजिक गोष्टींबद्दल भाष्य करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. अश्विनी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. नुकतंच तिने जालना लाठीचार्ज प्रकरणी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपलं सडेतोड मत व्यक्त केली आहे. “मराठा आरक्षण आणि लाठीचार्ज…का? कशासाठी?” अशी पोस्ट अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर करत जोरदार संताप व्यक्त केला आहे.
https://www.youtube.com/watch?v=2E1LaZsKfKA
काय आहे नेमकं प्रकरण
जालना येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. अंतरावली सराटी येथील गावात हा प्रकार घडला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी इथं आंदोलन सुरू होते. आंदोलकांच्या उपोषणाचा चौथा दिवस होता. या आंदोलनावेळी पोलिसांनी हा लाठीचार्ज केला आहे. यामध्ये काही आंदोलक आणि पोलीसही जखमी झाले आहेत.
मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जमुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. अंतरावली सराटी येथे पोलीस, ग्रामस्थ, आंदोलक यांचात वाद पेटला आहे. गावकऱ्यांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आला. आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी पोलिसांच्या व्हॅन गावाबाहेर काढल्या.