‘चोर मंडळातील एक मोदी लंडनच्या पार्टीत’.. ठाकरे गटाची मोदी सरकारवर आगपाखड

‘चोर मंडळातील एक मोदी लंडनच्या पार्टीत’.. ठाकरे गटाची मोदी सरकारवर आगपाखड

Uddhav Thackeray : भारताचे माजी सॉलिसिटर आणि ज्येष्ठ वकिल हरिश साळवे वयाच्या 68 व्या वर्षी विवाहबंधनात अडकले. लंडन येथे त्यांनी तिसरे लग्न केले. त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू असतानाच त्यांच्या पार्टीत ललित मोदीही (Lalit Modi) दिसला. यावरूनच साळवे यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारही अडचणीत आले आहे. याच मुद्द्यावर आता ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) सामनाच्या अग्रलेखातून आगपाखड केली आहे.

साळवे यांनी इंग्लँडमध्ये त्यांच्या विवाहाची हॅटट्रिक केली. त्यांनी तिसरा विवाह केला हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न झाला. पण, साळवे यांनी त्यांच्या तिसऱ्या लग्नाप्रित्यर्थ जी मेजवानी दिली त्यात श्रीमान साळवे यांच्या सोबतीने हिंदुस्तानला हवा असलेला भगोडा चिअर्स करताना दिसत आहे. यावर आता मोदी-शहांचे काय म्हणणे आहे? की तेही दिल्लीत बसून साळवे-ललित मोदी जोडीस चिअर्स करणार आहेत. ललित मोदी याने नीरव मोदी, विजय मल्ल्या, मोईन कुरेशी, मेहुल चोक्सी, नितीन संदेसरा यांच्याप्रमाणे देशातून पलायन केले आहे. ललित मोदी, मोईन कुरेशी हे हिंदुस्तानातील आर्थिक गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या सर्वच यंत्रणांना हवे आहेत व त्यात ईडी सुद्धा आहे.

Pankaja Munde यांची मोठी घोषणा; म्हणाल्या, 2024 च्या निवडणुकीआधी…

मोदी सरकारच्या फक्त थापाच थापा

साधारण 4500 कोटींच्या आर्थिक हेराफेरी प्रकरणात ललित मोदी गुन्हेगार आहे. प्रकरण अर्थात मनी लाँडरिंगचे आहे. त्याच्यावर आरोपपत्र दाखल झाले आहे आणि तो आज भगोडा आहे. असा हा देशाचा भगोडा लंडनमध्ये कायदेपंडित हरिश साळवे यांच्या मेजवानीत दिसतोय व त्याच हरिश साळवे यांना वन नेशन वन इलेक्शन समितीत माजी राष्ट्रपती व गृहमंत्री अमित शाह यांच्या बरोबरीने स्थान मिळाले याचा अर्थ असा की भ्रष्टाचार उखडून काढू, परदेशात पळून गेलेल्या घोटाळेबाजांना फरपटत आणू, सर्व काळा पैसा परदेशातून भारतात आणू या मोदींच्या फक्त थापाच थापा आहेत अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.

हा भाजपाचा नवा सनातन धर्म

आज देशाचे चित्र काय आहे? मोदी शहांच्या माणसांबरोबर भगोडा आरोपी ललित मोदी आरामात चिअर्स करीत आहे. हा एक नवाच सनातन धर्म भाजपने निर्माण केलेला दिसतोय. सगळेच मोदी चोर कसे, या एका विधानावर राहुल गांधी यांची खासदारकी मोदी सरकारने रद्द केली, त्यांचे घर काढून घेतले, त्यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावली. त्या चोर मंडळातील एक मोदी लंडन्या पार्टीत चिअर्स करताना संपूर्ण देशाने पाहिला. त्या मोदीला प्रेमालिंगन देणारे कायदेपंडित देशाच्या एक देश एक निवडणूक समितीत बसतील तेव्हा देशाच्या भावना नेमक्या कशा असतील, असा सवाल या लेखातून विचारण्यात आला आहे.

Jalna Maratha Protest : हा लेकराबाळांचा प्रश्न, आमची फसवणूक करु नका; मनोज जरांगेंचा इशारा

अमृतकालाचे विष करणारा प्रकार

राहुल गांधी यांनी सर्व मोदी चोर कसे हे विधान करताच साळवे दुःखी झाले. राहुल गांधी यांचे विधान असंसदीय असल्याचे सांगून साळवे यांनी मोदींची (पंतप्रधान) बाजू घेतली त्यामागचे इंगित आता उघड झाले. पंतप्रधान मोदी यांनी जो अमृतकाल निर्माण केला त्या अमृतकालाचे विष करणारा हा प्रकार आहे. मोदी व शहा यांना आता ललित मोदी-साळवे संबंधांवर संसदेत उत्तर द्यावे लागेल व उत्तर देताना भंबेरी उडेल म्हणून सत्ताधारी अमृतकालाचे विशेष अधिवेशनही गोंधळ घालून बंद पाडतील, असा दावा ठाकरे गटाने केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube