Pankaja Munde यांची मोठी घोषणा; म्हणाल्या, 2024 च्या निवडणुकीआधी…

Pankaja Munde यांची मोठी घोषणा; म्हणाल्या, 2024 च्या निवडणुकीआधी…

Pankaja Munde : भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी पुन्हा राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत देत शिवशक्ती परिक्रमा यात्रा काढली आहे. सोमवारपासून या यात्रेला सुरुवात झाली आहे. या यात्रेच्या माध्यमातून मुंडे या दहा जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. या यात्रेदरम्यान धार्मिक ठिकाणांना भेटी देणार आहेत तसेच नागरिकांशीही संवाद साधणार आहेत. या यात्रेदरम्यान नाशिकमध्ये आल्या असता आगामी काळात आपलं राजकारण कसं राहिल याचेही संकेत दिले.

मुंडे (Pankaja Munde) यांनी येथे मोठी घोषणा केली. 2024 विधानसभा निवडणुकीआधी यात्रा काढणार असल्याचे जाहीर केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मुंडे यांनी काल नाशिक येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. येथे त्यांनी मराठा आरक्षणासह राज्यात सुरु असलेल्या अन्य घडामोडींवरही भाष्य केले.

पंकजा मुंडे यांचा आजपासून शिवशक्ती परिक्रमा दौरा; असा असणार संपूर्ण दौरा

मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या, गेले दोन महिने मी माझ्याकडे लक्ष दिले. आपल्या देशात जाती धर्मावर वाद सुरू आहेत. तुमची मान खाली जाईल असे मी काही करणार नाही. तुम्हाला देण्यासाठी माझ्यातकडे सध्या काही नाही. हे काही शक्तीप्रदर्शन नाही. असे शक्तीप्रदर्शन करण्यासाठी खूप मोठे ठेकेदार पाहिजे असतात. तुमची मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी ही शिवशक्ती परिक्रमा आहे. मला कोणताच मोह नाही. मुंडेसाहेब नावाचा वृक्ष तयार झाला. त्या सावलीखाली मला जगायच आहे, असे मुंडे यावेळी म्हणाल्या.

राज्यातील राजकारणाला कंटाळून पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी दोन महिन्यांचा ब्रेक घेतला होता. तसेच भाजपच्या अंतर्गत राजकारणाला देखील पंकजा मुंडे वैतागल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे त्यांनी मधल्या काळात कोणत्याही प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली नव्हती. दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर पंकजा मुंडेंनी शिवशक्ती परिक्रमा दौरा आखला आहे. या दौऱ्यात अनेक मंदिरांना भेट देणार आहेत तसेच कार्यकर्त्यांना भेटणार आहेत.

शिवशक्ती परिक्रमा दौरा आजपासून सुरु झाला आहे. 4 सप्टेंबरला बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या घृष्णेश्वरपासून या दर्शन दौऱ्याला सुरुवात झाली. समारोप 11 तारखेला परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्री होणार आहे. राज्यातील जवळपास बारा जिल्हे आणि चार हजार किमीचा त्या प्रवास करणार आहेत.

शिव-शक्ती परिक्रमेचा प्रवास

पंकजा मुंडे या (Pankaja Munde) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्यानंतर कोपरगावकडे मोटारीने रवाना होतील. त्यानंतर माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या निवासस्थानी भेट घेणार आहेत. साडे अकरा वाजता येवल्यात अगमन, दुपारी बारा वाजता येवला येथून विंचूरकडे रवाना, दुपारी एक वाजता विंचूर येथून निफाडला रवाना, या ठिकाणी जळगाव येथील स्वर्गीय प्रल्हाद पाटील कराड यांच्या घरी भेट देणार आहेत.

निफाड शहरात स्वागत, दुपारी दीड वाजता निफाड शहर येथून पिंपळगाव बसवंतकडे रवाना, दुपारी अडीच वाजता पिंपळगाव बसवंत येथून जवळकेकडे रवाना, जवळके गावात स्वागत, यानंतर सव्वा तीन वाजता जवळके येथून सप्तश्रृंगी गडावर रवाना, सव्वाचार वाजता सप्तश्रृंगी गड दर्शन, त्यानंतर सव्वा पाच वाजता स्वामी समर्थ केंद्र दिंदोरी येथे दर्शन, दिंडोरी येथून सायंकाळी सहा वाजता नाशिककडे रवाना, सायंकाळी आठ वाजता स्व. रामभाऊ जानोरकर यांच्या घरी पंकजा मुंडे (Pankaja Munde) भेट देणार आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube