पंकजा मुंडे यांचा आजपासून शिवशक्ती परिक्रमा दौरा; असा असणार संपूर्ण दौरा

पंकजा मुंडे यांचा आजपासून शिवशक्ती परिक्रमा दौरा; असा असणार संपूर्ण दौरा

Shiv Shakti Parikrama : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा सक्रिय झाल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात शिवशक्ती परिक्रमा दौऱ्याचे (Shiv Shakti Parikrama) आयोजन केले आहे. या दौऱ्याची सुरुवात छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यापासून होणार आहे. आज संपूर्ण दिवस पंकजा मुंडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असणार आहेत.

राज्यातील राजकारणाला कंटाळून पंकजा मुंडे यांनी दोन महिन्यांचा ब्रेक घेतला होता. तसेच भाजपच्या अंतर्गत राजकारणाला देखील पंकजा मुंडे वैतागल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे त्यांनी मधल्या काळात कोणत्याही प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली नव्हती. दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर पंकजा मुंडेंनी शिवशक्ती परिक्रमा दौरा आखला आहे. या दौऱ्यात अनेक मंदिरांना भेट देणार आहेत तसेच कार्यकर्त्यांना भेटणार आहेत.

मराठा आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी आज मंत्रिमंडळाची बैठक, मनोज जरांगेंना चर्चेसाठी निमंत्रण

शिवशक्ती परिक्रमा दौरा आजपासून सुरु झाला आहे. 4 सप्टेंबरला बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या घृष्णेश्वरपासून या दर्शन दौऱ्याला सुरुवात होणार आहे. समारोप 11 तारखेला परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्री होणार आहे. राज्यातील जवळपास बारा जिल्हे आणि चार हजार किमीचा त्या प्रवास करणार आहेत.

शिव-शक्ती परिक्रमेचा प्रवास
आज पंकजा मुंडे या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन शिवशक्ती परिक्रमा सुरु करतील. त्यानंतर कोपरगावकडे मोटारीने रवाना होतील. त्यानंतर माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या निवासस्थानी भेट घेणार आहेत. साडे अकरा वाजता येवल्यात अगमन, दुपारी बारा वाजता येवला येथून विंचूरकडे रवाना, दुपारी एक वाजता विंचूर येथून निफाडला रवाना, या ठिकाणी जळगाव येथील स्वर्गीय प्रल्हाद पाटील कराड यांच्या घरी भेट देणार आहेत.

मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण द्या, ओबीसी नेत्यांनेच मांडली भूमिका

निफाड शहरात स्वागत, दुपारी दीड वाजता निफाड शहर येथून पिंपळगाव बसवंतकडे रवाना, दुपारी अडीच वाजता पिंपळगाव बसवंत येथून जवळकेकडे रवाना, जवळके गावात स्वागत, यानंतर सव्वा तीन वाजता जवळके येथून सप्तश्रृंगी गडावर रवाना, सव्वाचार वाजता सप्तश्रृंगी गड दर्शन, त्यानंतर सव्वा पाच वाजता स्वामी समर्थ केंद्र दिंदोरी येथे दर्शन, दिंडोरी येथून सायंकाळी सहा वाजता नाशिककडे रवाना, सायंकाळी आठ वाजता स्व. रामभाऊ जानोरकर यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत. त्यानंतर शहरात मुक्काम असणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube