Download App

मोठी बातमी, कराची, लाहोर आणि इस्लामाबादमध्ये भारताचा प्रतिहल्ला

Lahore Attack : पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर भारताकडून देखील पाकिस्तानवर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. माहितीनुसार भारतीय सैन्याकडून कराची

Lahore Attack : पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर भारताकडून देखील पाकिस्तानवर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. माहितीनुसार भारतीय सैन्याकडून कराची, लाहोर आणि पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे ड्रोन हल्ले सुरु केले आहे. भारताकडून होत असलेल्या कारवाईनंतर कराची, लाहोर आणि इस्लामाबादमध्ये बॅल्कआऊट करण्यात आले आहे.

तर दुसरीकडे सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, भारताकडून पाकिस्तानच्या सात शहरांवर कारवाई करण्यात येत आहे.  तर कोणत्याही क्षणी भारतीय नौदलाकडून पाकिस्तानविरोधात आरबी समुद्रात कारवाई करणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

जम्मूमध्ये ड्रोन आणि 8 क्षेपणास्त्रे पाडली

तर भारतीय हवाई संरक्षणाने जम्मूमध्ये हल्ला करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न उधळून लावला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मूमध्ये पाकिस्तानकडून ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले होते, परंतु भारतीय हवाई दलाने ते पाडले. त्याच वेळी अखनूरमध्ये सायरनचा आवाज ऐकू आला. याशिवाय पठाणकोट एअरबेसवरील ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्लेही उधळून लावण्यात आले आहेत. आजच्याच आधी भारताने पाकिस्तानातील कराची आणि लाहोरवर हल्ला केला होता; यामुळे संतप्त झालेल्या पाकिस्तानने रात्री जम्मूमध्ये कहर करण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी झाला.

पाकिस्तानने जम्मू नागरी विमानतळ, सांबा, आरएस पुरा, अर्निया आणि आजूबाजूच्या परिसरांना टार्गेट करून एकाच वेळी 8 क्षेपणास्त्रे डागली. पाकिस्तानकडून होत असेलेल्या या कारवाईनंतर देशातील 27 विमानतळे बंद करण्यात आली असल्याची देखील माहिती समोर आली आहे.

follow us