ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताचा पराभव, पहलगाम हल्ला ‘बंडखोरीचा हल्ला’; अमेरिकेचा धक्कादायक अहवाल

US Report On Operation Sindoor : एप्रिल 2025  मध्ये जम्मू आणि काश्मीरमधील पहगाम येथे झालेल्या हल्ला हा दहशतवादी हल्ला बंडखोरीचा हल्ला होता

US Report On Operation Sindoor

US Report On Operation Sindoor

US Report On Operation Sindoor : एप्रिल 2025  मध्ये जम्मू आणि काश्मीरमधील पहगाम येथे झालेल्या हल्ला हा दहशतवादी हल्ला बंडखोरीचा हल्ला होता असा धक्कादायक दावा अमेरिकेच्या एका अहवालात करण्यात आला आहे. तसेच या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने राबविलेला ऑपरेशन सिंदूरमध्ये देखील भारताला पराभव स्वीकारावा लागला असा दावा देखील या अहवालात करण्यात आल्याने मोदी सरकारवर विरोधक चारही बाजूने हल्लाबोल करत आहे. हा 800 पानांचा अहवाल अहवाल अमेरिका-चीन आर्थिक आणि सुरक्षा पुनरावलोकन आयोगाने (यूएससीसी) प्रसिद्ध केला आहे.

सध्या या अहवालावरुन काँग्रेससह (Congress) इतर विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर जोरदार टीका करत आहे. अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर काँग्रेस नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी पंतप्रधान मोदी (PM Modi) आणि परराष्ट्र मंत्रायल या अहवालाविरोधात काही बोलणार किंवा निषेध नोंदवणार का? असा प्रश्न विचारात हा अहवाल आमच्या राजनैतिक कूटनीतिला एक मोठा धक्का असल्याचे म्हटले आहे.

राफेलच्या प्रतिमेला नुकसान, अहवालात मोठा दावा

यूएससीसीने प्रसिद्ध केलेल्या या अहवालात ऑपरेशन सिंदूरदरम्यान (Operation Sindoor) पाकिस्तानने भारताचे राफेल जेटसह किमान सहा भारतीय लढाऊ विमाने पाडल्याचा दावा केला आहे. त्यामुळे राफेलची प्रतिमा खराब झाली असं देखील या अहवालात सांगण्यात आले आहे. तसेच चीनने भारत आणि पाकिस्तान युद्धाचा वापर थेट युद्धात त्यांच्या आधुनिक शस्त्नांची चाचणी घेण्यासाठी आणि जगाला दाखवण्यासाठी केला असल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. यानंतर चीनने इंडोनेशियाला 75000 कोटींना 42 J-10C लढाऊ विमाने विकण्याचा करार केला असं देखील या अहवालात दावा करण्यात आला आहे.

पाकिस्तानला चीनकडून गुप्त माहिती मिळाली

यूएससीसीने या अहवालात असं देखील म्हटले आहे की, या युद्धादरम्यान पाकिस्तानला चीनकडून गुप्त माहिती मिळत होती. ज्याचा फायदा घेत पाकिस्तानने या युद्धात भारताचा पराभव केला. तसेच या युद्धात पाकिस्तानने चीनची HQ-9 हवाई संरक्षण प्रणाली, PL-15 क्षेपणास्त्रे आणि J-10 लढाऊ विमाने वापरली.

आम्ही संघर्षातून मोठे झालोय..भोरमध्ये राष्ट्रवादीने नगराध्यपदाचा उमेदवार फोडल्यानंतर उदय सामंतांच प्रत्युत्तर…

यूएससीसीबद्दल जाणून घ्या

यूएससीसी चीनवर लक्ष ठेवून अमेरिकेच्या सुरक्षेला धोका निर्माण होत आहे की नाही याबाबत अहवाल अमेरिकन काँग्रेसला सादर करत असते. यूएससीसी स्वतः कोणतीही कारवाई करत नाही; ते फक्त एक अहवाल तयार करते आणि अमेरिकन काँग्रेसला सादर करते. आयोगाच्या शिफारसी अंतिम अहवालात समाविष्ट करण्यासाठी, त्यांना किमान आठ सदस्यांचा (दोन तृतीयांश) पाठिंबा आवश्यक आहे.

Exit mobile version