Gyanesh Kumar Said Rahul Gandhi Will Give Affidavit : मुख्य निवडणूक आयुक्त (India Election Commission) (सीईसी) ज्ञानेश कुमार यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर (Rahul Gandhi) अप्रत्यक्षपणे निशाणा साधत मतचोरीसंदर्भातील आरोप फेटाळले. त्यांनी म्हटले की, निवडणूक आयोग आणि मतदार यादीबाबत (Voter List) केलेले आरोप निराधार आणि खोटे आहेत. जर आरोप करणाऱ्यांकडे पुरावे असतील, तर त्यांनी सात दिवसांच्या आत प्रतिज्ञापत्र ( Affidavit) सादर करणे आवश्यक आहे; अन्यथा त्यांना संपूर्ण देशापुढे माफी मागावी लागेल.
‘उरुण इस्लामपूर’चे ऐतिहासिक नाव धोक्यात; शहरवासियांचे साखळी उपोषण, जयंत पाटलांचे राज्यपालांना निवेदन
गंभीर आरोप
ज्ञानेश कुमार म्हणाले (Gyanesh Kumar) की, मतदार यादी साफ करणे ही सर्व पक्षांची सामायिक जबाबदारी आहे. बिहारमध्ये आमचे बूथ लेव्हल अधिकारी, बूथ एजंट आणि राजकीय पक्ष यांच्यात संगनमताने काम सुरू होते. मात्र, निवडणूक आयोगाचा डेटा नसतानाही चुकीचे विश्लेषण करणे आणि एका महिलेने दोनदा मतदान केले असे सांगणे हे गंभीर आरोप आहेत. असे आरोप प्रतिज्ञापत्राशिवाय कारवाई करण्यायोग्य नाहीत कारण हे संविधान आणि आयोगाच्या कार्यपद्धतीस विरोधात आहे.
‘उरुण इस्लामपूर’चे ऐतिहासिक नाव धोक्यात; शहरवासियांचे साखळी उपोषण, जयंत पाटलांचे राज्यपालांना निवेदन
सात दिवसांत प्रतिज्ञापत्र
मुख्य आयुक्तांनी स्पष्ट सांगितले की, माझ्या सर्व मतदारांना गुन्हेगार ठरवत आहोत आणि आयोग गप्प आहे? असे होऊ शकत नाही. सात दिवसांत प्रतिज्ञापत्र न मिळाल्यास हे सर्व आरोप निराधार ठरतील. त्यांनी मतदान प्रक्रियेतील विश्वसनीयता आणि ट्रॅन्सपरेन्सवरही भर दिला आणि सांगितले की भारतात 60 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान होत असून जगातील सर्वात मोठी मतदार यादी तयार करण्यात आली आहे, ज्यामध्ये सुमारे 90 ते 100 कोटी मतदार आहेत.
आरोप निराधार आणि खोटे
सीईसी ज्ञानेश कुमार यांनी सर्व राजकीय पक्षांना १ सप्टेंबरपूर्वी प्रारुप मतदार यादीतील त्रुटी दाखवण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी स्पष्ट केले की आयोग त्या त्रुटी दुरुस्त करण्यास तयार असून, आक्षेप नोंदविल्यास जबाबदारी संबंधित पक्षावर येईल. निवडणूक आयोग आणि मतदार यादीबाबत केलेले आरोप निराधार आणि खोटे आहेत. जर त्यांच्याकडे दाव्याचे पुरावे असतील, तर 7 दिवसांच्या आत प्रतिज्ञापत्र द्यावे. अन्यथा संपूर्ण देशाची माफी मागावी, असं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी म्हटले आहे.