India GDP : भारतीय अर्थव्यवस्थेबाबत चांगली बातमी समोर आली आहे. भारताने जीडीपीमध्ये 4 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा ओलांडला आहे. भारताच्या जीडीपीने 4 ट्रिलियन डॉलर्स टप्पा ओलांडण्याची ही पहिलीच वेळ आहे. आता भारतीय अर्थव्यवस्थेचे पुढील लक्ष्य 5 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत असणार आहे. 2025 पर्यंत देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत नेण्याचे लक्ष्य पंतप्रधान मोदींनी ठेवले आहे. यासंदर्भातील माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सद्वारे दिली आहे.
This is what dynamic, visionary leadership looks like !
That’s what our #NewIndia progressing beautifully looks like !
Congratulations to my fellow Indians as our Nation crosses the $ 4 trillion GDP milestone!
More power to you, more respect to you Hon PM @narendramodi ji !… pic.twitter.com/wMgv3xTJXa— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 19, 2023
देवेंद्र फडणवीस यांनी देशांच्या जीडीपी रँकिंगसह एक फोटो शेअर केला आहे. त्यानुसार जीडीपीचा आकार 4 ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे गेला आहे. फडणवीस एक्स पोस्टमध्ये म्हणाले, “असं दिसते गतिमान, दूरदर्शी नेतृत्व! आपली सुंदर प्रगती करत असलेला #NewIndia असे दिसते! आपल्या देशाने $4 ट्रिलियन जीडीपीचा टप्पा ओलांडला म्हणून माझ्या भारतीय बांधवांचे अभिनंदन!” असं फडणवीस पोस्टमध्ये म्हणाले आहेत.
भारताचा जीडीपी 2030 पर्यंत जपानला मागे टाकू शकतो. यामुळे भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. तेव्हा भारत आशियातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. S&P ग्लोबल इंडिया मॅन्युफॅक्चरिंगने नुकतेच हे सांगितले होते की, “2023 आणि 2024 च्या उर्वरित कालावधीसाठी सतत वेगवान विस्तार अपेक्षित आहे,” S&P Global ने सांगितले आहे. देशांतर्गत मागणीतील मजबूत वाढीवर आधारित आहे. भारताचा GDP 2030 पर्यंत US$ 7300 अब्ज पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.
जखमी महिला पोलिसांची दखलही घेतली नाही, जाऊन विचारा काय झालं…; भुजबळांनी चाकणकरांना फटकारलं
दरम्यान, IMF आणि Goldman Sachs च्या अंदाजानुसार, 2075 पर्यंत भारत अर्थव्यवस्थेच्या बाबतीत अमेरिकेपेक्षा पुढे असणार आहे. भारत 2075 पर्यंत जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणार आहे. फक्त चीनच आपल्या पुढे असणार आहे. IMF च्या अंदाजानुसार, 2027 मध्ये भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणार आहे.