जखमी महिला पोलिसांची दखलही घेतली नाही, जाऊन विचारा काय झालं…; भुजबळांनी चाकणकरांना फटकारलं

  • Written By: Published:
जखमी महिला पोलिसांची दखलही घेतली नाही, जाऊन विचारा काय झालं…; भुजबळांनी चाकणकरांना फटकारलं

Chhagan Bhujbal : राज्यात सध्या आरक्षणाच्या मुद्दावरून मराठा (Maratha) आणि ओबीसी (OBC) समाजात संघर्ष पेटला. एकीकडे मनोज जरांगे हे सभा घेत आहेत. तर दुसरीकडे ओबीसींच्या बाजून मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे आपली भूमिका जाहीर करत आहे. याशिवाय जरांगेकडून होत असलेल्या टीकेलाही भुजबळांकडून प्रत्युत्तर दिलं जातं आहे. कालच्या अंबड येथील सभेत तर भुजबळांनी अंतरवलीतील घटनाक्रम सांगून जरांगे पाटलांवर टीका केली. तर जखमी महिला पोलिसांची महिला आयोगाने साधी दखलही न घेतल्यानं त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar), उपसभापती नीलम गोऱ्हे यांना चांगलचं फटकारलं.

जायकवाडी पाणी वाटप वाद पेटला…विखेंच्या भूमिकेवर मुंडेंचा नाराजीचा सूर 

आज एका सभेत बोलतांना भुजबळांनी पुन्हा अंतरवलीतील घटनाक्रमाचा पुनरूच्चार केला. ते म्हणाले, अंतरलीत पोलिसांत़बव लाठीचार्ज करण्यात आला. पोलिसांचा लाठीमार सर्वांनी पाहिला. मात्र 70 पोलीस जखमी झाले होते. पोलिसांवर दगडफेक सुरू झाली. या लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळं पोलिस जखमी झाले. महिला पोलिसही जखमी झाल्या. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दगडफेक झाल्यानं पोलिसांनी लाठीचार्ज केला. पण, माध्यमातून पोलिसांची बाजू पुढे आली नाही. एकच बाजू समोर आली की, आंदोलकांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला. दोशी नावाच्या एसपींनी पोलीस जखमी झाले, हे सांगयाला हवं होतं. फडणवीस यांनीही पोलिसांसोबत काय घडलं ते सांगायला हवं होतं. मात्र, उलट घडलं. पोलिसच निलंबित करण्यात आले.

Gandhi Talks करणार यंदाचा इफ्फी चित्रपट महोत्सव खास; जाणून घ्या चित्रपटाची खासियत 

भुजबळ म्हणाले, जखमी महिला पोलिसांची कुणीही दखल घेतली नाही. पण, रुग्णालयात रेकॉर्ड आहे. राज्यात महिला आयोग आहे. रुपाली चाकणकर, नीलम गोऱ्हे यांना आम्ही महिला पोलिसांचे पत्ते दतो, त्यांनी आणि सुप्रिया सुळेंनी तिकडे जाऊन त्या महिला पोलिसांना विचारायला हवं की, नक्की काय झालं? त्यांची बाजू ऐकून घेतल्यावर मग रिपोर्ट करा. मी खोटं बोललं असेल तर महाराष्ट्राची क्षमा मागेन. मी अनेकांकडून चौकशी केली. सर्व परिस्थिती जाणून घेतल्यावरच मी हे बोलतोय, असं भुजबळ म्हणाले.

ते म्हणाले, राज्यात आमदारांची घरं जाळली, पक्षांची कार्यालये फोडली. तुम्हाला जे पाहिज, ते शांततेनं मागा. शांततेनं आंदोलन करा. पण, हे राज्यात संघर्ष पेटवत आहेत. मी पालकमंत्री होतो, मी कधी मराठा वाद आणला नाही, असं त्यांनी सांगितलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube