जायकवाडी पाणी वाटप वाद पेटला…विखेंच्या भूमिकेवर मुंडेंचा नाराजीचा सूर

जायकवाडी पाणी वाटप वाद पेटला…विखेंच्या भूमिकेवर मुंडेंचा नाराजीचा सूर

Jayakwadi Dam : समन्यायी पाणी वाटप (Jayakwadi water distribution) धोरण कायद्याला अनुसरून, जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam) नगर जिल्ह्यातून पाणी देण्यास विरोध होऊ लागला आहे. दरम्यान नुकतेच अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या बैठकीत जायकवाडीला पाणी सोडण्यात येऊ नये असा सर्व राजकीय नेतेमंडळींनी एकमुखी ठराव केला, अशी माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांनी दिली. मात्र आता याच मुद्द्यावरून मंत्री धनंजय मुंडे (Dhanajay munde) यांनी नाराजीचा सुरु व्यक्त केला आहे. दरम्यान जायकवाडीला पाणी सोडले जावे अशी आग्रही भूमिका मराठवाड्यातील नेत्यांनी घेतली असल्याने यावर आता काय तोडगा निघणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

यंदाच्या वर्षाला नगर जिल्ह्यात पावसाने अल्प हजेरी लावली आहे, यामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये पाण्याची पातळी देखील गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे. यातच दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने जिल्ह्यातील धरणांमधून मराठवाड्याला पाणी सोडण्यात येऊ नये यासाठी नगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडून देखील विरोध होऊ लागला आहे. तर दुसरीकडे न्यायालयीन आदेश आणि समन्यायी पाणीवाटप धोरणानुसार मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळायला हवे असा आग्रह मंत्री धनंजय मुंडे यांनी केला आहे.

“सहा जाती वगळून मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करा; OBC नेत्याची मोठी मागणी

मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंडेंची नाराजी…
मुंबईमध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. याबैठकीत जायकवाडी पाणी वाटपाचा मुद्दा चांगलाच गाजल्याचे समजते. या बैठकीत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी पाणीप्रश्नावर आपली नाराजी व्यक्त केली. न्यायालयीन आदेश आणि समन्यायी पाणीवाटप धोरणानुसार मराठवाडय़ाला हक्काचे पाणी मिळायला हवे अशी मागणी मुंडे यांनी केली.

मात्र दोन दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जायकवाडीला पाणी न सोडण्याबाबत ठराव झाल्याची माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली. या ठरावावर देखील मंत्री मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली. पालकमंत्र्यांनी असा ठराव घेतलाच कसा, असा सवाल मुंडे यांनी केल्याचे समजते. दरम्यान जायकवाडी पाणी वाटपावरून आता महायुतीमधील नेतेच आमनेसामने आले आहे.

“मंत्री असून तुमचं ऐकलं जात नाही” : भुजबळांच्या ‘त्या’ आरोपाची रोहित पवारांकडून खिल्ली

मराठावाडा-नगर-नाशिक ‘पाणी संघर्ष’
राज्यात यावर्षी पावसाचा अत्यल्प प्रतिसाद होता. यामुळे अनेक भागात पाण्याची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. यातच येत्या काळात नाशिक, अहमदनगर विरुद्ध मराठवाडा यांच्यात पाण्यासाठीचा संघर्ष पुन्हा पेटण्याची चिन्ह आहेत. दरम्यान समन्यायी पाणी वाटप धोरण कायद्यानुसार नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून तब्बल 8.603 टीएमसी पाणी औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी धरणात सोडण्याचे नियोजन जलसंपदा विभागाकडून करण्यात आले. मात्र नगर जिल्ह्यातून पाणी सोडण्यात येऊ नये अशी भूमिका लोकप्रतिनिधींनी घेतली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube