Pahalgam Terror Attack : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहार दौऱ्यादरम्यान पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. पाकव्याप्त काश्मीरमध्ये ( PoK) थेट लष्कर घुसवून भारत कारवाई करण्याची भीती पाकिस्तानला सतावत आहे. याभागात पाकिस्तानने लष्कराची जमवा जमव सुरू केली आहे. अतिरिक्त कुमक तैनात केली आहे.
पाकव्याप्त काश्मीर दहशतवाद्यांचा गड
पाकव्याप्त काश्मीर बळकावल्यापासून हा पट्टा पाकिस्तानने दहशतवाद्यांना आंदण म्हणून दिला आहे. या भागात त्यांची घरं आहेत. या भागात दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात येते. दारुगोळा जमा करणे, तयार करण्याची कामे करण्यात येतात. येथूनच अनेक बेकायदेशीर कृत्य होतात. जगभरातील अनेक दहशतवादी संघटनांचे म्होरके येथेच एकत्र येतात. अल कायदा, इसिस, तालिबान यासह इतर सर्व दहशतवादी गटाचे नेते या भागात सातत्याने दिसतात.
पहलगाम हल्ल्यातील गुन्हेगारांना शोधण्यासाठी अमेरिकेची.. काय म्हणाल्या, गुप्तचर विभागाच्या प्रमुख?
पाकव्याप्त काश्मिरमध्ये मध्ये दहशतवाद्यांसाठी 17 प्रशिक्षण केंद्र, 37 मोठे लॉचिंग पॅड्स आहेत. या ठिकाणी पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय दहशतवाद्यांना प्रशिक्षण देते. त्यांना धार्मिकदृष्ट्या कट्टर करते. त्यांना भारताविरोधात तयार करण्यात येते. भारतात विविध ठिकाणी हल्ला करण्यासाठी खास प्रशिक्षण याच कॅम्पमध्ये देण्यात येते.
पाकिस्तानी सैन्यदल या ठिकाणी तरुणांना दहशतवादाचे प्रशिक्षण देते. त्यांना जन्नतमध्ये 70 हुरांचे स्वप्न दाखवण्यात येते. त्यांना धर्मासाठी बलिदान केले तर जन्नत मिळते असे बिंबवण्यात येते. कमी वयातील तरुणांना आणून त्यांना मोहोरा करण्यात येते. त्यांना कमी वयातच धर्मवेडे करण्यात येते.
दहशतवादी संघटनांचे संमेलन
पहेलगाम हल्ल्यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात जगभरातील दहशतवादी संघटनांच्या प्रतिनिधींचे संमेलन झाले. PoK मधील रावलकोटमध्ये जैश ए मोहम्मद, लष्कर ए तैयबा आणि हमास या दहशतवादी संघटनांचे दहशतवादी या संमेलनात सहभागी होते. त्याचे व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. यामध्ये दहशतवादी संघटनांनी हल्ल्याची तयारी केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
या ठिकाणी आहेत दहशतवादाच्या शाळा
1.दुदनियाल
2.अब्दुल बिन मसूद
3.चेलाबंदी
4.मनस्ताय
5.देवलियान
6.घडी दुपट्टा
7.सफैदा
8.हलन सुलामी
9.बाग
10.अलियाबाद
11.फॉरवर्ड कहुटा
12.रावला बंदरगाह
13.डूंगी
14.तत्ता पानी
15.हजीरा
16.सेंसा
17.कोटली
18.निकल
19.पलानी
20. बरला परिसर