पॅन कार्ड, बॅंकिंग अन् डिजिटल पेमेंट…सर्वसामान्यांचं गणित कोलमडणार? आजपासून नियमांत मोठा बदल!

देशात १ एप्रिलपासून अनेक नवीन कायदे आणि नियम लागू होत आहेत. डिजिटल पेमेंट व्यवहारांसाठी अधिक कडक सुरक्षा नियम लागू होणार आहेत.

Untitle (6)

Untitle (6)

New Rules From April 1 India : देशात आज एक एप्रिलपासून अनेक कायदे आणि नियमांत बदल होणार आहेत. नवीन प्राप्तिकर कायदा, वेतन संहिता यांच्यासह डिजिटल पेमेंटसाठी कडक सुरक्षा यांचा यामध्ये समावेश असणार आहे. या महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच पॅन कार्ड, एटीएम आणि युपीआयच्या काही नियमांमध्ये बदल करण्यात आलायं. या बदलाचा थेट परिणाम सामान्य जनतेवर होणार आहे.

शेअर बाजार आणि गुंतवणूक

शेअर बाजारात फ्यूचर्स अँड ऑप्शन्सच्या उलाढालींवर ‘एसटीटी’ अनुक्रमे 0.05 आणि 0.15 टक्के होणार.
शेअर बाजारातून सार्वभौम सुवर्ण रोखे खरेदी करणाऱ्यांना तसेच शेअर बायबॅक करणाऱ्या कंपन्यांना भांडवली नफा कर द्यावा लागणार.

म्युच्युअल फंडाचा खर्च पारदर्शक होणार.
‘एनएसडीएल’ किंवा ‘सीडीएसएल’कडे भरलेला फॉर्म 15 जी किंवा 15 एच सर्व बँका आणि संस्थांना आपोआप कळणार.

पॅन कार्ड काढायचे किंवा अपडेट करायचे असेल तर आधार कार्डासोबत जन्म दाखला, मतदार ओळखपत्र, इयत्ता दहावीचे गुणपत्रक, पासपोर्ट किंवा वाहन परवाना यापैकी एक अतिरिक्त दस्तावेज द्यावा लागेल.

नोकरी आणि पगार
नवीन वेतन संहिता लागू होणार. कोणत्याही कंपनीत मूळ पगार एकूण पगाराच्या रकमेच्या किमान 50 टक्के असणे बंधनकारक. त्यामुळे भविष्य निर्वाह निधीसाठी जास्त रक्कम कापली जाईल.

बँकिंग आणि डिजिटल पेमेंट
फसवणूक रोखण्यासाठी ऑनलाइन पेमेंट करताना ओटीपी पुरेसा नसेल. बायोमेट्रिक किंवा डिव्हाईस बाईंडिंग अशा अतिरिक्त सुरक्षा उपायांच्या माध्यमातून दोन वेगळ्या प्रकारे ओळख सिद्ध करावी लागेल.

अमोल खताळांच्या अडचणीत वाढ, आमदारकी रद्द होणार? थोरातांची याचिका न्यायालयाने स्वीकारली

प्रवास आणि वाहतूक
गाडी सुटण्याच्या आधी वेळेत रेल्वे तिकीट रद्द करणे आवश्यक
फास्ट टॅग वार्षिक पास तीन हजार रुपयांऐवजी 3075 रुपये होणार.
उज्ज्वला योजनेतील लाभार्थींना 300 रुपयांचे अंशदान पुढेही मिळणार.

नवा प्राप्तिकर कायदा
1961 च्या जुन्या प्राप्तिकर कायद्याच्या जागी 2025 चा नवा प्राप्तिकर कायदा. कर वर्ष एक एप्रिल ते 31 मार्च ही एकच संकल्पना राहणार.
12 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर नाही. नोकरदार वर्गाला 75,000 रुपयांची अतिरिक्त सूट.
प्राप्तिकराचे दर पूर्वीप्रमाणेच राहणार.
फॉर्म 16 बंद होऊन फॉर्म 130 आणि फॉर्म 16 अ च्या जागी फॉर्म 131.
घरभाड्यावरील सवलतीसाठी घर मालकाचा पॅन क्रमांक आणि भाडे दिल्याचा पुरावा द्यावा लागणार.
नोकरदारांना करमुक्त जेवणाच्या कुपनावरील मर्यादा 50 वरून 100 रु.
मुलांच्या शिक्षणाच्या भत्त्यात दरमहा 100 रुपयांवरून प्रति मूल 3000 रुपये अशी वाढ.
व्यावसायिकांसाठी प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची मुदत आता 31 ऑगस्ट. चुकीचे रिटर्न दुरुस्तीसाठी आता 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ.
परदेश प्रवासावरील कर कपात 20 टक्क्यांवरून दोन टक्के इतका कमी.

डिजीटल पेमेंटसाठी आजपासून कोणते नवीन सुरक्षा नियम लागू?
एप्रिल 2026 पासून आरबीआयने सर्व ऑनलाईन व्यवहारांसाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) आणि बायोमेट्रिक पडताळणी अनिवार्य केली आहे.
नवीन आर्थिक वर्षात बँकिंग आणि ATM शुल्कात काय बदल झाला आहे?
आजपासून मोफत मर्यादेपेक्षा जास्त एटीएम व्यवहारांवर 23 रुपये अधिक टॅक्स आकारला जाईल आणि काही बँकांनी रोख विड्रॉल मर्यादा बदलली आहे.

देशात आजपासून नवीन ‘इन्कम टॅक्स ॲक्ट 2025’ लागू झाला असून पॅन कार्ड अर्जासाठी आधार कार्डावरील माहितीनुसार नवीन फॉर्म भरणे बंधनकारक आहे.

Exit mobile version