Download App

पन्नूच्या हत्येच्या कटात भारताचा हात? अमेरिकेच्या आरोपानंतर भारताने घेतला मोठा निर्णय

Gurpatwant Singh Pannu : खलिस्तानी अतिरेकी हरदीपसिंह निज्जरच्या हत्येत भारताचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो (Justin Trudeau) यांनी केला होता. त्यानंतर आता अमेरिकेनेही न्यूयॉर्कमधील खलिस्तान समर्थक व्यक्तीच्या हत्येचा कट भारतीय अधिकाऱ्याने रचल्याचा गंभीर आरोप केला आहे. यामध्ये 52 वर्षीय भारतीय अधिकाऱ्याचा सहभाग असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. भारताने मात्र अमेरिकेचा हा आरोप फेटाळून लावत हा चिंतेचा विषय असल्याचे म्हटले आहे. खलिस्तानी समर्थक गुरपतवंत सिंह पन्नूच्या (Gurpatwant Singh Pannu) हत्येचा कट रचण्यात भारतीय अधिकाऱ्याचा समावेश असल्याचा अमेरिकेचा आरोप चिंतेचा विषय आणि सरकारी धोरणांच्या विरुद्ध असल्याचे भारत सरकारने म्हटले आहे.

US on India-Pakistan Relations: अमेरिका करणार भारत-पाकिस्तानची मध्यस्थी, वाद सोडवण्यासाठी करणार प्रयत्न

या प्रकरणात भारताने आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणी आता उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे, अशी माहिती विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिली. याआधी बुधवारी अमेरिकी न्याय विभागाने म्हटले होते की या वर्षाच्या सुरुवातीला भारत सरकारच्या एका कर्मचाऱ्याने भारत आणि अन्य ठिकाणी दुसऱ्या लोकांना सोबत घेत अमेरिकेत एक वकील आणि राजकीय कार्यकर्त्याच्या हत्येचा कट रचला होता.

या अधिकाऱ्याने स्वतःची ओळख सुरक्षा प्रबंधन आणि गोपनीय विभागातील वरिष्ठ अधिकारी अशी करून दिली होती. अमेरिकी अधिकाऱ्यांनुसार या अधिकाऱ्याने हा कट यशस्वी करण्यासाठी एका जणाला एक लाख डॉलर देण्याचे मान्य केले होते. इतकेच नाही तर या वर्षात जून महिन्यात 15 हजार डॉलर दिलेही होते, अशी माहिती समोर आली आहे. बऱ्याच दिवसांपासून हा मुद्दा चर्चेत आहे. यानंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी पुन्हा भारताविरोधात आक्रमकपणे बोलण्यास सुरुवात केली आहे.

या प्रकरणात विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी याआधीही स्पष्टीकरण दिले होतो. ह मुद्दा भारताने गांभीर्याने घेतला आहे. कारण हा विषय आमच्या राष्ट्रीय सुरक्षा हितांवर परिणाम करत आहे, असे बागची म्हणाले होते. दरम्यान, या अमेरिकेने या कटाचा पर्दाफाश केल्याची बातमी सर्वात आधी फायनान्शियल टाइम्सने दिली होती. ज्यामध्ये म्हटले गेले होते की या कटाबाबत अमेरिकेने आपल्या काही सहकाऱ्यांना महत्वाचे अपडेट दिले आहेत.

अमेरिकेने हाणून पाडला गुरपतवंत सिंग पन्नूच्या हत्येचा कट, भारताला दिला इशाारा  

दरम्यान, यूएस फेडरल वकिलांनी पन्नू प्रकरणातील एका गुन्हेगाराविरुद्ध न्यूयॉर्क जिल्हा न्यायालयात कट रचल्याबाबत आरोपपत्र दाखल केले आहे. सध्‍या, यूएसचे जस्टीस डिपार्टमेंट हे आरोपपत्र उघडायचे आणि सार्वजनिक करायेच की नाही, याचा विचार करत आहे. यासोबतच निज्जर खून प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत वाट पाहण्याचाही विचार सुरू आहे. या प्रकरणाची माहिती असलेले लोक म्हणाले, ‘ज्या व्यक्तीवर आरोप आहे, तो अमेरिकेतून निघून गेला आहे.

Tags

follow us