Download App

LIVE : भारत सरकारचा आदेश.. तब्बल आठ हजार पाकिस्तानी ट्विटर अकाउंट बंद

पाकिस्तानकडून भारताच्या कुरापती काढणं सुरुच आहे. आताच हाती आलेल्या माहितीनुसार जम्मूच्या विविध भागांत ड्रोनद्वारे हल्ला केला गेला आहे.

India Pakistan War : पाकिस्तानकडून भारताच्या कुरापती काढणं सुरुच आहे. आताच हाती आलेल्या माहितीनुसार जम्मूच्या विविध भागांत ड्रोनद्वारे हल्ला केला गेला आहे. पाकिस्तानने ड्रोन्स आणि मिसाइल्सच्या मदतीने भारतातील नागरी ठिकाणांवर हल्ले चढवले आहेत.

LIVE NEWS & UPDATES

  • 08 May 2025 11:57 PM (IST)

    पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड असीम मुनीरची होणार उचलबांगडी

    पाकिस्तानी सैन्याचा प्रमुख जनरल असीम मुनीर याला पदावरून हटवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याच्या जागी शमशाद मिर्झा यांना लष्करप्रमुखाची जबाबदारी दिली जाऊ शकते अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. जम्मू काश्मीरातील पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड म्हणून जनरल असीम मुनीर याच्याकडे पाहिले जात आहे.

  • 08 May 2025 11:11 PM (IST)

    लाहोर, कराचीनंतर इस्लामाबादचा नंबर, क्षेपणास्त्रांचा वर्षाव; अर्धा पाकिस्तान अंधारात

    पाकिस्तानने भारतावर हल्ले केल्यानंतर भारताने दमदार काउंटर अटॅक सुरू केला आहे. लाहोर, कराची शहरांवर तुफान हल्ले सुरू केले आहेत. तसेच पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव सुरू केला आहे.

  • 08 May 2025 11:06 PM (IST)

    Video : राजस्थानच्या जोधपूरमध्ये पूर्ण ब्लॅकआऊट.. पाहा व्हिडिओ

  • 08 May 2025 11:04 PM (IST)

    देशभरातील 27 विमानतळे बंद करण्याचे आदेश

    पाकिस्तानकडून भारताच्या कुरापती काढणं सुरुच आहे. आताच हाती आलेल्या माहितीनुसार जम्मूच्या विविध भागांत ड्रोनद्वारे हल्ला केला गेला आहे. यासह अन्य काही ठिकाणी हल्ले करण्यात आले आहेत. यानंतर सुरक्षेच्या कारणामुळे देशभरातील 27 विमानतळे बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

  • 08 May 2025 10:59 PM (IST)

    मुंबई पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, दिल्लीतही कर्मचाऱ्यांच्या रजा कॅन्सल

    पाकिस्तानने भारतावर हल्ले सुरू केल्यानंतर देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील मुंबईतील पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. राजधानी दिल्लीतील सर्व कर्मचाऱ्यांच्या रजा व सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.

  • 08 May 2025 10:55 PM (IST)

    मोठा निर्णय! पंजाबसह सीमावर्ती राज्यांतील शाळा बंद, पोलिसांच्या सुट्ट्या रद्द

    पाकिस्तानने भारतावर थेट हल्ले करण्यास सुरुवात केल्यानंतर भारताने काउंटर अटॅक सुरू केला आहे. काही राज्यांतील शाळा बंद करण्याची घोषणा करण्यात आली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्याही सगळ्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.

  • 08 May 2025 10:43 PM (IST)

    विमानतळांवर राहणार चोख बंदोबस्त..

    देशातील सर्व विमान कंपन्या आणि विमानतळांना सुरक्षा उपाययोजना वाढवण्याचे नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोचे आदेश

    विमानतळावरील सर्व प्रवाशांची होणार तपासणी.

    टर्मिनल इमारतीत लोकांच्या प्रवेशावर बंदी.

    एअर मार्शल तैनात करण्याच्याही सूचना

  • 08 May 2025 10:29 PM (IST)

    भारताकडून लाहोरमध्ये ड्रोन हल्ले सुरू

    भारतीय सैन्याकडून पाकिस्तानमधील लाहोर येथे ड्रोन हल्ले सुरु करण्यात आले आहे. पाकिस्तानकडून जम्मू आणि काश्मीर येथे सुरु असलेल्या हल्ल्यांना भारताकडून प्रत्युत्तर म्हणून लाहोरमध्ये भारतीय सैन्याकडून ड्रोन हल्ले करण्यात येत आहे.

  • 08 May 2025 10:27 PM (IST)

    जम्मूचे विमानतळ होते टार्गेट

    पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारताची एस 400 सिस्टीम पूर्ण अॅक्टिव्ह झाली आहे. पाकिस्तानचे अनेक ड्रोन्स हवेतच नष्ट करण्यात आले आहेत. जम्मूत नेमके किती ड्रोन आले याची नेमकी माहिती अजून समोर आलेली नाही.

follow us