Download App

PM Modi on UCC : पीएम मोदींनी साधलं टायमिंग; म्हणाले, एका देशात दोन कायद्यांचं…

PM Modi on UCC: देशात आता समान नागरी कायद्यावर (UCC) जोरात चर्चा सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनीही या मुद्द्यावर महत्वाचे वक्तव्य केले आहे. पीएम मोदी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले, की एक घर दोन कायद्यांनी ज्या प्रकारे चालणार नाही तसेच देशातही दोन कायदे असू शकत नाही.

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मोदी यांनी समान नागरी कायद्यावर मत व्यक्त केले. तसेच या कायद्यावर पार्टी कार्यकर्त्यांनाही स्पष्ट शब्दांत संदेश दिला. विशेष म्हणजे, लॉ कमिशनने नुकतेच एक निवेदन प्रसिद्ध करत समान नागरी कायद्यावर देशातील नागरिकांकडून मते मागवली आहेत. नेमक्या त्याच वेळी पीएम मोदींनी समान नागरी कायद्याबाबत वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

Air India : “माझी ड्युटी संपली” : 350 प्रवासी अन् विमान जागेवर सोडून पायलट घराकडे

समान नागरी संहिता देशातील सर्व नागरिकांना समान कायदे असावेत असे स्पष्ट करते. भाजपाच्या मते युसीसी (युनिफॉर्म सिव्हिल कोड) एक देश एक कायद्याची मागणी करतो. देशात आजमितीस वेगवेगळ्या धर्मांसाठी वेगवेगळे कायदे आहेत. त्यामुळे भाजप मागील अनेक वर्षांपासून युसीसी लागू करण्याचा प्रयत्न करत आहे.

मोदी पुढे म्हणाले, दुहेरी व्यवस्थेनं देश कसा चालेल. सुप्रीम कोर्टाने वारंवार सांगितले आहे की समान नागरिक संहिता तयार करा. काही लोक मुस्लिमांनी भडकावण्याचे काम करत आहेत. मुस्लिमांबरोबर सध्या व्होट बँकेचे राजकारण केले जात आहे.

विपक्षी एकतेवरही मोदींनी जोरदार प्रहार केला. ते म्हणाले विरोधक फक्त घोटाळ्यांची खात्री देऊ शकतात. त्यांच्याजवळ घोटाळ्यांचा अनुभव आहे. विपक्ष भ्रष्टाचाराची गॅरंटी आहे. आरजेडी, टीएमसीने काय घोटाळे आहेत त्यांचेही किस्से मोदींनी ऐकवले. मोदी म्हणाले, मी गरीबांना लुटणाऱ्या तसेच प्रत्येक घोटाळे बहाद्दरावर कारवाई करण्याची खात्री देतो. देशाला लुटणाऱ्यांचा पक्क हिशोब होणार आहे.

Tags

follow us