फ्लायदुबईच्या पायलटवरील हल्ल्याचा NIA करणार तपास; अपहरणविरोधी कायदा आणि UAPA अंतर्गत गुन्हा दाखल

Smit Machchhar: अपहरणविरोधी कायदा, 2016 आणि बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायदा (UAPA), 1967 मधील संबंधित तरतुदींनुसार आरोपीविरुद्ध गुन्हा.

Smit Machchhar

Smit Machchhar

India to probe attack on flydubai pilot Smit Machchhar : फ्लायदुबईच्या (flydubai) विमानाच्या कॉकपिटमध्ये भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मच्छर (Smit Machchhar) यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तपास आता राष्ट्रीय तपास संस्थेकडे (NIA) देण्यात आलाय. या प्रकरणी एनआयने 9 ऑक्टोबर रोजी अपहरणविरोधी कायदा, 2016 आणि बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायदा (UAPA), 1967 मधील संबंधित तरतुदींनुसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.


सर्व बाजूंनी चाल करुन येतोय! विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देत राहुल गांधींचा मोदी सरकारला थेट इशारा

30 सप्टेंबर रोजी दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या फ्लायदुबईच्या FZ1073 या विमानाच्या कॉकपिटमध्ये कॅप्टन स्मित मच्छर यांच्यावर त्यांच्या ओमानी सहवैमानिकाने चाकूने अनेक वार केले होते. या हल्ल्यात मच्छर गंभीर जखमी झाले होते. विमानाचे अपहरण करून विमान कोसळवून मोठा डाव ओमानी सहवैमानिकाचा होता. हा डाव मच्छर यांनी वार सहन करून उधळून आणण्याच्या उद्देशाने हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.


Tanushree Dutta : खरंच मृत्यू झाला का? नाना पाटेकरांच्या निधनानंतर तनुश्री दत्ताचे पुन्हा वादग्रस्त विधान

जखमी अवस्थेतही दाखवले प्रसंगावधान
सहवैमानिकाच्या हल्ल्यात गंभीर जखमी होऊनही कॅप्टन स्मित मच्छर यांनी धैर्य आणि प्रसंगावधान दाखवले. त्यांनी कॉकपिटचा दरवाजा उघडण्यात यश मिळवले. त्यामुळे इतरांना हल्लेखोराला ताब्यात घेणे शक्य झाले. त्यांच्या या कृतीमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर विमान सौदी अरेबियातील तबूक येथे वळवण्यात आले. तेथे जखमी वैमानिकाला तातडीने वैद्यकीय उपचार देण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना अबू धाबी येथे हलवण्यात आले.

पंतप्रधान मोदींकडून धैर्याचे कौतुक
या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅप्टन स्मित मच्छर यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्या धैर्याचे व प्रसंगावधानाचे कौतुक केले. भारतीय अधिकाऱ्यांसह इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि संयुक्त अरब अमिरातीच्या अधिकाऱ्यांनीही त्यांच्या धाडसाचे कौतुक केले आहे. कॅप्टन मच्छर यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, अबू धाबी येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती सुधारत आहे. या प्रकरणाचा तपास आता एनआयए करणार आहे. विमानाचे कथित अपहरण करण्याचा किंवा ते कोसळवण्याचा प्रयत्न झाला होता का, यासह हल्ल्यामागील उद्देशाचा तपास केला जाणार आहे.

Exit mobile version