Smit Machchhar : ‘कॅप्टन स्मित मछार हिरो’…PM मोदींकडूनही कौतूकाचा वर्षाव!
'फ्लायदुबई'च्या विमानावर नियंत्रण मिळवत 180 प्रवाशांचे प्राण वाचवणारे भारतीय वंशाचे कॅप्टन स्मित मच्छार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलंय.
Smit Machchhar : दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या ‘फ्लायदुबई’च्या विमानाच्या कॉकपिटमध्ये घडलेल्या गंभीर घटनेत स्वतः जखमी होऊनही विमानावर नियंत्रण मिळवत १८० प्रवाशांचे प्राण वाचवणारे भारतीय वंशाचे कॅप्टन स्मित मच्छार (Smit Machchhar) यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. ‘कॅप्टन स्मित मछार हे हिरो आहेत,’ असे म्हणत मोदी यांनी त्यांच्या धाडसाचे अभिनंदन केले.
Captain Smit Machchhar is a HERO.
In the face of the gravest danger and despite being seriously injured, he showed immense courage and an unwavering resolve to protect the lives of others.
His valour helped save hundreds of lives and avert a great tragedy.
India is proud of Captain Machchhar.
Praying for his speedy recovery, renewed strength and good health.
— Narendra Modi (@narendramodi) October 1, 2026
पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत कॅप्टन मच्छार यांच्या शौर्याचे कौतुक केले. “मोठ्या धोक्याचा सामना करताना आणि गंभीर जखमी झाल्यानंतरही इतरांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांनी मोठे धैर्य दाखवले. त्यांच्या शौर्यामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले आणि मोठी दुर्घटना टळली. भारताला कॅप्टन मच्छार यांचा अभिमान आहे. ते लवकर बरे होण्यासाठी, नव्या ताकदीसाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो,” असे मोदी यांनी म्हटले आहे.
नेमकं काय घडलं होतं?
फ्लाय दुबईचे FZ1073 हे विमान दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून इस्रायलमधील बेन गुरियन विमानतळाकडे जात होते. विमान हवेत असताना कॉकपिटमध्ये दोन्ही वैमानिकांमध्ये वाद झाला. सहवैमानिकाने कॅप्टन मच्छार यांच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी होऊनही मच्छार यांनी विमानाचा ताबा घेतला आणि सुरक्षितपणे विमान उतरवले.