Download App

हुश्श..! फ्रान्समध्ये अडकलेल्या भारतीय प्रवाशांची सुटका; 4 दिवसांनंतर विमान मुंबईत

Indian Aircraft Returned from France : मानवी तस्करीच्या संशयावरून फ्रान्सने भारतीय प्रवाशांचे विमान रोखले होते. या विमानातील प्रवाशांची कसून चौकशी करण्यात येत होती. मागील चार दिवसांपासून हे विमान फ्रान्सची (Indian Aircraft Returned from France) राजधानी पॅरिस शहरात थांबवण्यात आले होते. रविवारी या विमानाला उड्डाणाची परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर सोमवारी विमानाने वॅट्री विमानतळावरून उड्डाण केले. त्यानंतर आज पहाटे 4 वाजता विमान मुंबईत पोहोचल्याची माहिती मिळाली आहे. या विमानाने दुबई येथून उड्डाण घेतले होते. हे विमान निकारागुआ या देशात जाणार होते. या मार्गाने दरवर्षी लाखो प्रवासी बेकायदेशीरपणे अमेरिका आणि मॅक्सिकोत प्रवेश करतात.

France : भारतीय प्रवाशांचे विमान फ्रान्सने रोखले, प्रवाशांची कसून चौकशी; धक्कादायक कारण समोर

मानवी तस्करीचा संशय फ्रान्सच्या एजन्सींना होता. त्यामुळेच हे विमान रोखण्यात आले होते. याबाबत अज्ञातांकडून माहिती मिळाल्यानंतर ही कार्यवाही करण्यात आली  होता. विशेष म्हणजे, 26 जानेवारी या भारतीय प्रजासत्ताक दिनी भारत सरकारने फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्मानुएल मैक्रों यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले आहे. मैक्रों यांनीही भारताचे हे आमंत्रण स्वीकारले आहे. मैक्रों यांनी स्वतः ट्विट करत याची माहिती दिली होती. या घडामोडी घडत असतानाच त्याच वेळी ही घटना समोर आली होती.

https://twitter.com/ANI/status/1739494792856490304?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1739494792856490304%7Ctwgr%5E95454f133457c175dc1394a254e2bad0a6bbe3b5%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.esakal.com%2Fmumbai%2Fflight-with-indians-held-in-france-over-human-trafficking-lands-in-mumbai-aau85

स्थानिक मीडियानुसार, फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी दावा केला होता की निकारागुआकडे जात असलेल्या या विमानाचा वापर मानवी तस्करीसाठी केला जाऊ शकतो. हे विमान संयुक्त अरब अमिरात येथून निघाले होते. आता या विमानात जे प्रवासी आहेत त्यांचा प्रवास करण्याचे कारण काय, अटी आणि शर्ती काय आहेत याची चौकशी सुरू करण्यात आली होती. आता प्रवाशांची चौकशी सुरू करण्यात आली असली तरी या प्रवाशांना आणखी किती दिवस येथे ठेवण्यात येणार आहे, त्यांना पुन्हा भारतात परत पाठवले जाणार का, या प्रश्नांची उत्तरे फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी दिलेली नव्हती.

PHOTO : फ्रान्सच्या बॅस्टिल डे परेडमध्ये पंतप्रधान मोदी खास पाहुणे, अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणाले..

अखेर चार दिवसांच्या चौकशीनंतर रविवारी या विमानाला उड्डाणाची परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर विमानातील काही प्रवाशांनी त्यांच्या देशात परतण्यास नकार दिला होता. त्यामुळे विमानाच्या उड्डाणाला उशीर झाला. या ताब्यात घेतलेल्या विमानातील प्रवाशांची चौकशी चार न्यायाधीशांनी केली. यानंतर विमानाला सोडून देण्याचे आदेश या न्यायाधीशांनी केले. त्यानंतर सोमवारी सकाळी वॅट्री विमानतळावरून विमानाने उड्डाण घेतले. या विमानात एकूण 303 प्रवासी होते त्यातील 276 प्रवासी माघारी परतल्याचे सांगण्यात येत आहे.

Tags

follow us