Download App

भारतीयांनी इनरवेअर घालणं बंद केलं? रुपा ते जॉकीपर्यंत बड्या कंपन्यांच्या विक्रीत मोठी घसरण

मुंबई : गणेशोत्सव, दसरा, दिवाशी अशा सणासुदीच्या काळात लोकांनी पुन्हा एकदा कपड्यांची खरेदी सुरू केली आहे. मात्र याच दरम्यान एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. लोक नॉर्मलपासून पार्टी वेअर ते ऑफिस वेअरपर्यंत सर्व प्रकारचे कपडे, शूज आणि सौंदर्य उत्पादने खरेदी करत आहेत. पण, अंडरवेअर किंवा इनरवेअर खरेदी करण्याकडे लोकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे जॉकी, डॉलर, रुपा या आघाडीच्या इनरवेअर ब्रँडच्या विक्रीत घट मोठी झाली आहे. सणासुदीच्या काळात खरेदीसाठी फॅशनेबल कपड्यांची विक्री वाढली असली तरी अंतर्वस्त्रांची विक्री मात्र वाढलेली नाही. यात लहान मुले, महिला, पुरुष अशा सर्वांचा समावेश आहे. (Indian people have turned away from buying underwear or innerwear)

पण भारतातील लोकांनी इनरवेअर खरेदी करण्याकडे पाठ का फिरवली आहे? जाणून घेऊया यामागचे कारण काय आहे…

भारतात लोकांनी आपले इनरवेअर घेणे बंद केले आहे काय? असा सवाल सध्या विचारला जात आहे. याचे कारण म्हणजे डिसेंबर 2022 च्या शेवटच्या तिमाहीत अंडरवेअरचा वापर 55 टक्क्यांनी कमी झाला होता. वर्षानुवर्षे अंडरवियरच्या खरेदीत घट होत आल्याने गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत महसुलात यंदाच्या तिमाहीत 7.5% ची घट आणि विक्रीमध्ये 11.5% घट झाली आहे.

ईडीच्या छापेमारीने ‘बॉलिवूड’चे धाबे दणाणले; ‘त्या’ इव्हेंटनंतर दिग्गज कलाकार रडारवर

अभ्यासकांच्या मते विक्रीत घट होण्याचे मुख्य कारण म्हणजे वाढत्या महागाईमुळे लोकांकडे खर्च करण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत. तसेच, ऑनलाइन स्टोअर्सवर जास्त सूट मिळत असल्याने भारतीय ऑनलाइन मार्केटिंगला अधिक महत्त्व देत आहेत. स्थानिक दुकानदारांचे म्हणण्यानुसार, मल्टी ब्रँड आऊटलेट्स पूर्वी जेवढा स्टॉक खरेदी करत होते तेवढा आता खरेदी करत नाहीत. ते जे खरेदी करत आहेत त्याची देयके देण्यासही विलंब होत आहे, त्यामुळे उत्पादकांच्या खेळत्या भांडवलावरही परिणाम होत आहे.

या कंपन्यांची विक्री घटली आहे

डिसेंबर 2022 ला संपलेल्या तिमाहीत, जॉकीची पॅरेंट कंपनी असलेल्या पेज इंडस्ट्रीजच्या विक्रीत तिमाही घट झाली आहे. पेज इंडस्ट्रीजचे व्हॉल्यूम 11 टक्क्यांनी कमी झाले आहे. तर रूपा अँड कंपनीच्या व्हॉल्यूममध्ये 52 टक्के घट नोंदवली गेली आहे. गेल्या वर्षभरात रुपा कंपनीचे शेअर्स 345 वरुन 272 पर्यंत खाली आले आहेत. मार्चमध्ये तर 207 रुपयांपर्यंत रुपाच्या शेअर्समध्ये घसरण झाली होती.

Rockstar DSP: लंडन कॉलिंगमध्ये रॉकस्टार डीएसपीची रंगणार अफलातून मैफिल

युरोमॉनिटर इंटरनॅशनलच्या मते, भारतातील इनरवेअर मार्केट 48,123 कोटी रुपयांच्या घरात असल्याचा अंदाज आहे. यात पुरुषांचे प्रमाण 39% तर महिलांचे प्रमाण 61% आहे. मात्र अभ्यासकांच्या मते, जर भविष्यात अंडरवियर किंवा इनरवेअरच्या विक्रीत घट होत राहिली तर अर्थव्यवस्थेत सर्व काही ठीक आहे, असे म्हणता येणार नाही. जॉकी अंडरवेअर सामान्यतः शहरी बाजारपेठेत विकली जाते. मात्र जॉकीच्या विक्रीचाही ट्रेंड कमी होत आहे, त्यामुळे येणारा काळ आव्हानात्मक असू शकतो, असाही दावा अभ्यासक करत

Tags

follow us