नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवत मोठा निर्णय जाहीर केला असून, यंदाच्या 2024-25 च्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थांना भारतीय विद्यापीठांमध्ये वर्षातून दोनदा प्रवेश घेता येणार आहे, अशी माहिती UGC चे प्रमुख जगदेश कुमार यांनी दिली आहे. यापूर्वी UGC ने शैक्षणिक वर्षात जानेवारी आणि जुलैमध्ये ओपन अँड डिस्टन्स लर्निंग (ODL) आणि ऑनलाइन मोड अंतर्गत द्विवार्षिक प्रवेशांना परवानगी देण्याचा निर्णय घेतला होता.(Indian Universities To Offer Admissions Twice A Year From 2024-25 Says UGC Chief Jagadesh Kumar )
ते मोठेचं होतील! तावडेंच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी चंद्रकांतदादांची कोल्हापुरातून साखरपेरणी
भारतीय विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांना आता परदेशी विद्यापीठांच्या धर्तीवर वर्षातून दोनदा प्रवेश देण्याची परवानगी विद्यापीठ अनुदान आयोगाने दिली आहे असे जगदेश कुमार यांनी सांगितले. 2024-25 सत्रापासून विद्यापीठांमध्ये द्विवार्षिक प्रवेश जुलै-ऑगस्ट आणि जानेवारी-फेब्रुवारीमध्ये दिले जातील असेही कुमार यांनी स्पष्ट केले. विद्यापीठांमधील द्विवार्षिक प्रवेश भारताच्या उच्च शिक्षण प्रणालीला जागतिक शैक्षणिक मानकांशी जुळवून घेतील, असेही ते म्हणाले.
एआय इंजिनिअरींग सर्व्हिसेस लिमिडेटमध्ये मेगा भरती सुरू, महिन्याला 27,940 रुपये पगार
द्विवार्षिक विद्यापीठ प्रवेशामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा टिकवून ठेवण्यास मदत होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. द्विवार्षिक प्रवेशांमुळे उद्योगांना त्यांची कॅम्पस भरती वर्षातून दोनदा करता येईल, यामुळे रोजगाराच्या संधी वाढण्याबरोबरच त्यात सुधारणा होईल. याशिवाय द्विवार्षिक प्रवेशामुळे उच्च शिक्षण संस्था (HEIs) त्यांच्या संसाधन वितरणाचे नियोजन करण्यास सक्षम होतील असेही UGC प्रमुखांनी स्पष्ट केले. ज्या विद्यार्थांना काही कारणांमुळे प्रवेश मिळवता आला नाही. त्यांना पुढील वर्षापर्यंत वाट न बघता आता या निर्णयामुळे प्रवेश घेता येणार आहे. यामुळे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याचं टेन्शन कमी होण्यास मदत होईल.