Indians in Iran, leave country immediately Indian embassy on alert mode after Trump’s threat : अमेरिका आणि इराण युद्धामध्ये युद्ध विराम असला तरी देखील जगावरील संकट अद्याप टळलेलं नाही. कारण एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एकीकडे युद्धविराम वाढवला असला तरी देखील इराणला वारंवार अटी मान्य करण्यासाठी धमक्या देत आहेत. पार्श्वभूमीवर आता भारतीय दुतावासाने इराणमध्ये असलेल्या भारतीयांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. यासाठी दुतावासाने एक परिपत्रक जारी केलं आहे.
ट्रम्प यांच्या धमकीनंतर भारतीय दुतावास अलर्ट मोडवर
पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर आता भारतील दुतावासाने इराणमध्ये असलेल्या भारतीयांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. यासाठी दुतावासाने एक परिपत्रक जारी केलं आहे. यामध्ये म्हटलं आहे की, भारत आणि इराण दरम्यान काही विमानसेवा सुरू झाल्याच्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर आणि पूर्वीच्या सूचनांनुसार, भारतीय नागरिकांना हवाई किंवा जमिनी मार्गाने इराणला प्रवास न करण्याचा जोरदार सल्ला देण्यात येत आहे.
⚠️ Advisory as on 23 April 2026. pic.twitter.com/WIPNNtFspd
— India in Iran (@India_in_Iran) April 23, 2026
प्रादेशिक तणावामुळे हवाई क्षेत्रावरील निर्बंध आणि कामकाजातील अनिश्चितता यांचा इराणला येणाऱ्या आणि जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानसेवांवर परिणाम होत आहे.पुन्हा एकदा असे सूचित करण्यात येत आहे की, सध्या इराणमध्ये असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी दूतावासाशी काटेकोरपणे समन्वय साधून, निश्चित केलेल्या जमिनीवरील सीमा मार्गांनी देश सोडावा. मार्गदर्शनासाठी, दूतावासाशी खालील क्रमांकांवर संपर्क साधता येईल: मोबाईल क्रमांक: 989128109115, +989128109102, +989128109109, +989932179359, Email: cons.tehran@mea.gov.in अशा सुचना देत या संपर्क क्रमांकांव संपर्क साधण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
