India’s entry into Pax Silica : जगभरात सध्या दोन गोष्टी सर्वाधिक चर्चेत आहेत त्या म्हणजे आर्टिफिशीयल इंटेलिजन्स आणि महत्वाच्या खनिजांवर नियंत्रण. 21 व्या शतकातील सत्ता फक्त सीमांवर नाही तर तंत्रज्ञानावर आणि सप्लाय चेनवर ठरत आहे. एआय, सेमीकंडक्टर, डेटा सेंटर्स आणि रेअर अर्थ मेटल्स या सगळ्यांवर ज्याचे वर्चस्व, त्याचेच भवितव्य अधिक मजबूत.
अशा वेळी भारताने एक मोठं आणि रणनीतीक असं पाऊल उचललं आहे. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील पॅक्स सिलिका या महत्वाच्या गटबांधणात भारत अधिकृतपणे सामील झाला आहे. हा केवळ एक करार नाही, तर भविष्यातील तंत्रज्ञान आणि जागतिक अर्थकारणात भारताची भूमिका अधिक बळकट करणारा टप्पा मनाला जातो. मग नेमकं हे पॅक्स सिलिका गठबंधन काय आहे? त्यामागचा उद्देश काय आहे? आणि भारतासाठी याचा नेमका अर्थ काय? चला, सविस्तर जाणून घेऊया
भारत आता अमेरिकेच्या पॅक्स सिलिका या महत्वाच्या रणनीतीक गटबंधनात अधिकृतपणे सामील झाला आहे. एआय इम्पॅक्ट समिटदरम्यान आयोजित विशेष समारंभात या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
अमेरिका आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय आणि जागतिक खनिज पुरवठा साखळी अधिक सुरक्षित आणि विविधिकृत करण्यासाठी इंडो पॅसिफिक भागातील पार्टनर असणाऱ्या देशांबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी इच्छुक आहे. या प्रयत्नात भारताची भूमिका अत्यंत महत्वाची मनाली जात आहे. भारताच्या सहभागानंतर या रणनीतीक गटबंधनात सहभागी देशांची संख्या आता दहा एवढी झाली आहे.
मोठी बातमी! भिवंडी महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे बंडखोर नारायण चौधरी विराजमान
चला तर मग समजून घेऊयात, नेमकं पॅक्स सिलिका गटबंधन काय आहे? त्याचा उद्देश काय आहे? आणि कोणते देश त्यात सहभागी आहेत?
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार पॅक्स सिलिका हा एआय आणि महत्वाच्या तंत्रज्ञानाशी संबंधित सप्लाय चेन सुरक्षित करण्यासाठीचा एक महत्वाकांक्षी उपक्रम आहे. सहयोगी देशांच्या नव्या आर्थिक सुरक्षा करारांना चालना देणे हा यामागचा मुख्य हेतू आहे. मागील वर्षी 12 डिसेंबर रोजी वॊशिंग्टन येथे झालेल्या पॅक्स सिलिका शिकार परिषदेत सहभागी देशांनी घोषणापत्रावर साह्य केल्या होत्या. पॅक्स हा ऐतिहासिक शब्द असून तो शांतता, स्थैर्य आणि समृद्धी यांचे प्रागतिक मनाला जातो.
अमेरिकेतील आर्थिक व्यवहारांचे सचिव जेकब हेल्बर्ग यांनी म्हटले होते की, 20 व्या शतकात जग तेल आणि स्टीलवर चालत होते. मात्र 21 व्या शतकात जग हे कोम्पटयुटरवर सुरू आहे. हे कॉम्प्युटर तयार करण्यासाठी लिथियम आणि कोबाल्टसारख्या खनिजांची गरज असते. पॅक्स सिलिकाचा उद्देश म्हणजे विश्वासार्ह देशांसोबत एकत्रित आराखडा तयार करून भविष्यातील एआय आणि तंत्रज्ञान क्षेत्र मजबूत करणे.
या गतबंधनात ऊर्जा, महत्वाची खनिजे, हायटेक उत्पादन प्रकल्प, एआय मॉडेल्स, सेमीकंडक्टर, नेटवर्क, प्रगत उत्पादन तंत्रज्ञान, लॉजिस्टिक्स, खनिज प्रक्रिया आणि ऊर्जा क्षेत्रांमध्ये व्यापक सहकार्याचा समावेश आहे. खासगी उद्योगांची भागीदारी वाढवणे, चुकीच्या बाजार पद्धतींना आळा घालणे, अतिनिर्भरता कमी करणे आणि संवेदनशील तंत्रज्ञानाचे संरक्षण करणे हे देखील यामागचे प्रमुख असे मुद्दे आहेत. विश्वासार्ह आयसीटी नेटवर्क, फायबर ऑप्टिक केबल्स आणि डेटा सेंटर्स उभारून सुरक्षित आणि समृद्ध भविष्य घडवणे, हा या करारामागचा उद्देश आहे.
भिगवण प्रकरणात ट्विस्ट; अचानक तरुणी पोलीस ठाण्यात हजर; सांगितलं अहिल्यानगर कनेक्शन
या गटबंधनाचा एक महत्वाचा हेतू म्हणजे कोणत्याही एका देशावर अति अवलंबित्व कमी करणे. म्हणजेच कच्चा माल. तंत्रज्ञान किंवा उत्पादनांसाठी एका देशावर अवलंबून न राहता पर्यायी व्यवस्था उभी करणे. जरी कोणाचं नाव स्पष्टपणे घेतलेलं नसलं, तरी चीनच्या प्रभावाला तोल देण्याचा हा प्रयत्न असल्याचं मानलं जातं. विशेषतः रेअर अर्थ मेटल्सच्या पुरवठा साखळीला सुरक्षित ठेवण्यावर भर दिला आहे.
रेअर अर्थ मेटल्स म्हणजे काय तर पृथ्वीच्या गर्भात आढळणाऱ्या 17 दुर्मिळ धातू. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात या धातूंना अत्यंत धोरणात्मक महत्व आहे. शस्त्रनिर्मितीपासून, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, वाहन उद्योग, एरोस्पेस, सेमीकंडक्टर उत्पादन आणि ग्राहक वस्तू, या सर्व क्षेत्रांत रेअर अर्थ घटक अनिवार्य आहेत. सध्या जागतिक स्तरावर रेअर अर्थ खनिजांच्या खाणकामात चिंचा 60 ते 70 टक्के वाटा आहे.
आता पाहुयात पॅक्स सिलिका मध्ये सहभागी देश कोणते आहेत. पॅक्स सिलिका गटबंधनात सह्या करणारे देश भारत, ऑस्ट्रेलिया, ग्रीस, इस्त्रायल, जपान, कतार, दक्षिण कोरिया, सिंगापूर, संयुक्त अरब अमिरात आणि युनायटेड किंग्डम हे आहेत. याशिवाय काही देश आणि संस्था औपचारिकरित्या सह्या न करता या उपक्रमाशी जोडले गेले आहेत. त्यात कॅनडा, युरोपियन युनियन, नेदर्लंड्स, आर्थिक सहकार आणि विकास संघटना म्हणजेच OECD आणि तैवान यांचा समावेश आहे.
एकूणच पाहता पॅक्स सिलिका हे केवळ तांत्रिक सहकार्य नसून भविष्यातील जागतिक आर्थिक आणि तांत्रिक शक्ती संतुलन घडवण्याचा एका मोठा प्रयत्न आहे. एआय सेमीकंडक्टर आणि महत्वाच्या खनिजांवर नियंत्रण म्हणजेच भविष्यातील अर्थव्यवस्थेवर प्रभाव. विशेष म्हणजे त्या दिशेने भारतानं टाकलेलं हे पाऊल निश्चितच धोरणात्मकदृष्ट्या महत्वाचं मानलं जात आहे.
