Madhya Pradesh News : कचऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. मोठ्या शहरांत दररोज लाखो टन कचरा तयार होतो. या कचऱ्याची विल्हेवाट लावणे मोठे जिकिरीचे काम असते. देशाची राजधानी दिल्ली शहरात (Delhi) कचऱ्याची समस्या अतिशय जटील बनली आहे. दिल्ली-गाझियाबाद बॉर्डरवर कचऱ्याचे मोठमोठे ढीग दिसतात. यावरून शहराची दिशा आणि दशा निश्चित होते. पण याच देशात असे एक शहर आहे जिथे कचऱ्यातून उत्पन्न आणि परिवहन सेवा चालविण्याचा मार्ग शोधून काढण्यात आला आहे.
देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून नावारूपाला आलेले शहर म्हणून इंदोर ओळखले (Indore City) जाते. याच शहरात कचऱ्याच्या माध्यमातून बस चालविण्याचे काम काही वर्षांपासून सुरू आहे. आता तुम्ही म्हणाल की कचऱ्याचा वापर करून बस कशी काय चालविली जाऊ शकते. कचऱ्यातून पैसे कसे काय मिळू शकतात, तुम्हाला पडलेल्या याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊ या..
Air Force Fighter Plane Crashes : मोठी बातमी! मध्य प्रदेशात हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळले
इंदोर शहरात सन 2018 पासूनच कचऱ्यातून बायो सीएनजी इंधन तयार केले जात आहे. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा हा प्रयत्न नगर प्रशासनाने अनेक वर्षे आधीच सुरू केला आहे. शहरात बायो सीएनजी प्लँट बसवण्यात आला. येथे दररोज 20 टन ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. यातून जो बायो सीएनजी गॅस तयार होतो त्यावर शहरात सिटी बस धावतात. इतकेच नाही तर शहरातील रिफिल स्टेशनवर देखील हा गॅस उपलब्ध करून दिला जातो. यामुळे नगर निगम प्रशासनाला दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते.
मागील वर्षातील सप्टेंबर महिन्यात नगर प्रशासनाने GOBARdhan प्लँट लावला होता. या प्लँटमधून दररोज 17 हजार किलो बायो सीएनजी तयार केला जातो. या गॅसचा उपयोग इंधन म्हणून केला जातो. या माध्यमातून दरवर्षी 1.30 लाख टन कार्बन डाय ऑक्साइडचे उत्सर्जन होत नाही. यामुळे शहरातील वातावरण प्रदूषण मुक्त राहते. इंदोर मधील हा प्लँट देशातीलच नाही तर आशिया खंडातील सर्वात मोठा प्लँट आहे.
मध्य प्रदेशात ११ घरांवर बुलडोझर कारवाई; फ्रिजमध्ये बीफ ठेवल्याचा आरोप, एकाला अटक