Download App

महागाईनं सर्वसामान्यांचं कंबरडं मोडणार, घरगुती गॅस सिलेंडर तब्बल 50 रुपयांनी महागला

नवी दिल्ली : मार्च (March) महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा (Inflation) मोठा फटका बसलाय. महिन्याच्या पहिल्याच दिवशी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या (LPG Cylinder) किंमतीत 50 रुपयांनी वाढ झालीय. आता नव्या दरानुसार दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत (LPG Price) 1103 रुपयांवर पोहोचलीय. तर, मुंबईत (Mumbai) एलपीजीचे दर 1052.50 रुपयांवरुन थेट 1102.50 रुपये प्रति सिलेंडरवर पोहोचले आहेत. देशातील सर्वसामान्यांसाठी हा महागाईचा मोठा झटका मानला जातोय.

मिळालेल्या माहितीनुसार, 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ झालीय. तर, 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत 350.50 रुपयांची वाढ करण्यात आलीय. दिल्लीत आता 19 किलोचा व्यावसायिक सिलेंडर 2119.50 रुपयांना मिळणारंय. तर घरगुती एलपीजी सिलिंडर 1103 रुपयांवर पोहोचलाय. वाढलेले दर आजपासून लागू झाले आहेत.

आजपासून बदलणाऱ्या नियमांमुळं थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम

जाणून घ्या महानगरांमधील दर (घरगुती सिलेंडर्स)
(जुने दर) / (नवीन दर)
दिल्ली : 1053 रुपये / 1103 रुपये.
मुंबई : 1052.50 रुपये / 1102.50 रुपये.
कोलकाता : 1079 रुपये / 1129 रुपये.
चेन्नई : 1068.50 रुपये / 118.50 रुपये.

गत 8 महिन्यांनंतर घरगुती सिलेंडरच्या किंमती वाढल्या असून यापूर्वी 1 जुलै 2022 ला घरगुती सिलेंडरच्या किमतींत वाढ झाली होती. त्यावेळी जुलैमध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या दरांत वाढ करण्यात आलीय. त्यानंतर व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली असली तरी घरगुती सिलेंडरच्या किमती मात्र स्थिर होत्या. आज घरगुती आणि व्यावसायिक दोन्ही सिलेंडर्सच्या दरांत वाढ करण्यात आलीय.

Tags

follow us