Download App

Adani Share Price : अदानीमध्ये गुंतवणूक करत तीन दिवसांत कमावले ₹4245 कोटी, कोण आहेत राजीव जैन?

  • Written By: Last Updated:

हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये मोठी घसरत होत होती.अदानीच्या शेअर्सची किंमत जवळपास 85 टक्क्यांनी घसरली होती आणि अदानी समूहाचे मार्केट कॅप 145 अब्ज डॉलरहून अधिक घसरले होते. पण मागील आठवड्यात अमेरिकन कंपनी जीक्यूजी पार्टनर्स अदानींसाठी तारणहार म्हणून समोर आली. राजीव जैन यांच्या जीक्यूजी पार्टनर्स कंपनीने अदानी समूहाचे 15,446 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. ही बातमी अदानी समुहासाठीफायदेशीर ठरली आहे.

जीक्यूजी पार्टनर्सच्या गुंतवणुकीच्या दुसऱ्या दिवसापासून अदानीच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी येऊ लागली आहे. अदानी ग्रुपचे जवळपास सर्वच शेअर्स वाढू लागले आहेत. पण याचा फायदा केवळ अदानी समूहालाच नाही तर अदानी समूहाच्या कंपन्यांच्या गुंतवणूकदारांनाही झाला आहे. पर्यायाने याचा जीक्यूजी पार्टनर्स यांनाही झाला आहे.

हेही वाचा : Adani Share Price : अदानीच्या शेअर्सच्या किंमतीत वाढ, LIC चे काय झाले ?

3 दिवसात 4245 कोटी कमावले

अदानी ग्रुपसाठी राजीव जैन हे संकट मोचक म्हणून पुढे आले आहेत.पण त्यांनी तीन दिवसांत बंपर नफाही कमावला आहे.  जीक्यूजी पार्टनर्स कंपनीने अदानीच्या शेअर्सच्या वाढीचा फायदा घेतला आहे. अवघ्या तीन दिवसांत त्याच्या खरेदी केलेल्या शेअर्सचे गुंतवणूक मूल्य ४२४५ कोटी रुपयांनी वाढले आहे.

जीक्यूजी पार्टनर्सने  ब्लॉक डीलद्वारे अदानी ग्रुपमधील 15446 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. 2 मार्च रोजी राजीव जैन यांच्या कंपनीने अदानीच्या चार शेअर्समध्ये 15446 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती, जी सोमवारी सकाळी 19691 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

राजीव जैन कोण आहेत ?

राजीव जैन हे जन्माने भारतीय असून त्यांनी अजमेर विद्यापीठातून अकाउंटिंगचा अभ्यास केला आणि त्यातच पदव्युत्तर पदवी घेतल्याचं फोर्ब्स मध्ये म्हटलंय. त्यानंतर त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ मियामी मध्ये फायनान्स आणि इंटरनॅशनल बिझनेसमध्ये एमबीए केलं.

यानंतर राजीव जैन यांनी स्विस बँक कॉर्पोरेशनमध्ये इंटरनॅशनल इक्विटी एनालिस्ट म्हणून काम करायला सुरुवात केली. 23 वर्षांच्या अनुभवानंतर त्यांनी जून 2016 मध्ये जीक्यूजी पार्टनर्स ही फर्म सुरू केली. जगभरातील 1000 पेक्षा जास्त संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या मालमत्तेचं व्यवस्थापन ही कंपनी करते. आपल्या ग्राहकांसाठी आर्थिक सल्लागार म्हणूनही काम करते.

Tags

follow us