Download App

Bharat Jodo Yatra : २१ पक्षांना निमंत्रण, १२ सहभागी होणार. पण या पाच पक्षांना आमंत्रणच नाही

  • Written By: Last Updated:

कन्याकुमारीपासून सुरु झालेली राहुल गांधी (Rahul gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून अखेर जम्मू काश्मीरमधल्या श्रीनगर येथे पोहोचली आहे. आज या यात्रेचा शेवटचा दिवस आहे. आजच्या समारोपाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी काँग्रेसकडून देशभरातील २१ समविचारी पक्षांना निमंत्रण दिलं होतं. पण ५ पक्षांना काँग्रेसने निमंत्रण पाठवलं नाही.

काँगेसने आमंत्रण दिल्यापैकी १२ पक्ष आजच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. तर उर्वरित ९ पक्षांनी सुरक्षेच्या कारणास्तव या कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.

कोणते पक्ष सहभागी होणार ?

काँग्रेसने निमंत्रण दिलेल्या २१ पक्षांपैकी १२ पक्षांचे नेते भारत जोडो यात्रेच्या समारोपात सहभागी होणार आहे. राज्यातील शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी होणार आहे.

याशिवाय एमके स्टॅलिन यांचा डीएमके, तेजस्वी यादव यांचा आरजेडी, नितीशकुमार यांचा जेडीयू, सीपीआय (एम), व्हीसीके, केरळ काँग्रेस, फारुख अब्दुल्ला यांचा नॅशनल कॉन्फरन्स, मेहबूबा मुफ्ती यांचा पीडीपी आणि शिबू सोरेन यांचा झारखंड मुक्ती मोर्चा हे पक्ष श्रीनगरमध्ये आयोजित समारोप कार्यक्रमात सहभागी होतील.

या पक्षांना निमंत्रण नाही

एआयडीएमके, जगनमोहन रेड्डी यांची वायएसआरसीपी, नवीट पटनायक यांची बीजेडी, असदुद्दीन ओवैसी यांची एआयएमआयएम आणि आसाममधील एआययूडीएफ या पक्षांना काँग्रेसने आमंत्रित केलं नाही.

Tags

follow us