तात्काळ इराण सोडा… सीजफायरनंतर निर्देश जारी करत भारतीय दुतावासाचा भारतीयांना सल्ला

Iran America War मध्ये ट्रम्पकडून युद्धविराम देण्यात आला तरी खबरदारी म्हणून भारतीय दुतावासाने इराणमधील भारतीयांना नवे निर्देश जारी केले.

Iran America War

Iran America War

Iran America War Indian embassy issues directives and advises Indians after ceasefire : अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Trump) यांनी इराणला दिलेल्या धमकीनंतर पश्चिम आशियामधील तणाव शिगेला पोहोचला होता. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून युद्धविराम देण्यात आला असून इराणवरील विनाशकारी हल्ले दोन आठवड्यांसाठी स्थगित करण्यात आल्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केलीयं. यासंदर्भातील घोषणा करताना ट्रम्प यांनी काही अटी आणि शर्ती घातल्या आहेत. त्यामुळे धोका जरी टळला असला तरी देखील खबरदारी म्हणून भारतीय दुतावासाने इराणमधील भारतीयांसाठी नवे निर्देश जारी केले आहेत.

सीजफायरनंतर भारतीय दुतावासाचे निर्देश…

सीजफायरनंतर भारतीय दुतावासाने जार केलेल्या निर्देशांमध्ये म्हटलं आहे की, 7 एप्रिल 2026 च्या निर्देशांनंतर सध्याची परिस्थिती सुधारली असली तरी देखील इराणमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरीकांना दुतावासाच्या मार्गदर्शन आणि सुचनांचं पालन करत लवकरात लवकर इराण सोडावं. त्याचबरोबर कोणत्याही आंतराष्ट्रीय सीमांजवळ दुतावासाला पुर्व कल्पना न देता जाण्याचा प्रयत्न करू नका. असं या निर्देशांमध्ये सांगण्यात आलं आहे.

‘लिंगपिसाट’ला सुट्टी नाहीच! पोलिस कोठडीतून सुटताच न्यायालयीन कोठडीत अडकला, सुनावणीत काय घडलं?

दरम्यान मंगळवारी भारत सरकारने इराणमधील भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाचे निर्देश जारी केले होते. पुढचे 48 तास जिथे आहात तिथेच सुरक्षित राहा, असे निर्देश भारत सरकारने इराणमधील भारतीयांना दिले होते. होर्मुझ सामुद्रधुनी न उघडल्यास मोठ्या हल्ल्याचा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला होता. इराणसाठी आजची रात्र ही काळरात्र ठरू शकते, इराणचे नामोनिशाण मिटवू अशी धमकी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली होती. त्यानंतर इराण आणि अमेरिकेमधील तणाव अधिकच वाढला होता. परिणामी जगावर युद्धाचं संकट पसरल्याचं चित्र होतं. यामध्ये भारतीय दूतावासाने स्पष्ट निर्देश देत म्हटले होतं की, पुढील 48 तास जिथे आहात तिथेच थांबा. नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे. तसेच वीज प्रकल्प, लष्करी ठिकाणे आणि उंच इमारतींच्या वरच्या मजल्यांपासून दूर राहावे, असंही सांगण्यात आलं होतं.

डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून संपूर्ण ‘युद्धविराम’

तब्बल 40 दिवसांपासून सुरु असलेला इराण-इस्त्राइल (Iran-Israel War) संघर्षाला आज पूर्णविराम मिळालायं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून युद्धविराम देण्यात आला असून इराणवरील विनाशकारी हल्ले दोन आठवड्यांसाठी स्थगित करण्यात आल्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केलीयं. यासंदर्भातील घोषणा करताना ट्रम्प यांनी काही अटी आणि शर्ती घातल्या आहेत.

60 सेकंदांत पाकड्यांची अब्रू गेली; ‘ड्राफ्ट’ शब्द हटवला, पण शरीफ दणक्यात ‘एक्स्पोज’ झाले

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध अखेर आज थांबलं आहे. अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमधला संघर्ष अखेर थांबला असून दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाली आहे. दोन्ही देशांनी सैन्य कारवाया दोन आठवड्यांसाठी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा केल्यानंतर इराणचे परराष्ट्र मंत्री, सय्यद अब्बास अराघची, यांनी देखील एक्सवर पोस्ट करुन वृत्ताला दुजोरा दिला आहे. इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या वतीने निवेदन जारी करत अराघची यांनी दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी करण्यात आल्याचे मान्य केले आहे.

Exit mobile version