Iran Israel War crude oil prices at $100 per barrel How long can the Indian government keep oil prices stable : मध्य-पूर्व म्हणजे सध्या आखाती देश इराणमध्ये सुरू असलेल्या इराण विरूद्ध अमेरिका-इस्त्रायल युद्धामुळे जगभरामध्ये तणावाचे वातावरण पसरले आहे. त्यात कच्च तेल निर्मिती करणाऱ्या आखातातून तेल पुरवठ्यावर परिणाम होत असल्याने कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. दुसरीकडे युद्धामुळे तेल उत्पादन देखील कमी करण्यावर भर दिला आहे. आज 9 मार्च 2026 रोजी कच्च्या तेलाच्या किंमतीत तब्बल 18 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सध्या तरी वाढ होणार नाही. असं सरकारने स्पष्ट केलं आहे.
सरकार दर किती दिवस स्थिर ठेऊ शकणार?
यासाठी सुत्रांच्या माहितीनुसार सरकारने कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या तरी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सध्या तरी वाढ न करता काही काळ तोटा सहन करण्यास सांगितले आहे. मात्र सरकार ही दरवाढ फार काळ रोखू शकत नसल्याचं देखील तज्ज्ञ म्हटले आहे.सरकार आत्मविश्वासाने इंधनाच्या साठ्याची आकडेवारी वारंवार सादर करत आहे. त्यानुसार पुढील जास्तीत जास्त महिनाभर सरकार ही दरवाढ रोखू शकतं. कारण सरकारकडे आजच्या घडीला 60 दिवसांचा तेलाचा साठा शिल्लक आहे.
Video : एका थेंबाने सडेल व्यक्तीचं शरीर… इराणमध्ये पडणारा काळा पाऊस नेमका काय?
तसेच तेल बाजारात होणारे व्यवहार हे कधीही रोखीच्या स्वरूपात नसतात. जस जशी मागणी वाढते तस तसे हे भाव ठरतात. त्यामुळे जसं सोन्याची मागणी वाढल्यानंतर सोन्याच्या किंमती अचानक वाढल्या. तसच इंधनाच्या बाबतीत देखील होऊ शकतं. कारण जर आखातात तेल उत्पादन कमी झालं. थांबवलं. तर तेलाचा तुटवडा पडेल. तसेच रशियन तेल जरी मिळणार असले तरी देखील त्याला मागणी वाढलेली असणार. असं सगळं पाहता भारत सरकार फार काळ इंधनाची दरवाढ रोखू शकणार नाही. असं मत तज्ज्ञांनी मांडलं आहे.
