लय भारी अंदाज! चॅटजीपीटीपासून ग्रोकपर्यंत, 4 दिग्गज AI ने सांगितली युद्धविरामाची फायनल डेट!

AI On Iran-USA War इराण-अमेरिका युद्ध नेमकं कधी थांबणार? त्यावर जगातील ४ सर्वात मोठ्या 'AI' चॅटबॉट्सन दिलं उत्तर

लय भारी अंदाज! चॅटजीपीटीपासून ग्रोकपर्यंत, 4 दिग्गज AI ने सांगितली युद्धविरामाची फायनल डेट!

लय भारी अंदाज! चॅटजीपीटीपासून ग्रोकपर्यंत, 4 दिग्गज AI ने सांगितली युद्धविरामाची फायनल डेट!

Iran Usa Israel War Ceasefire Date Prediction Chatgpt Gemini Grok Claude Ai Hindi 2026 : सध्या सगळीकडे एकच चर्चा आहे… इराण आणि अमेरिका-इस्रायलचं हे युद्ध नेमकं थांबणार कधी? जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभं आहे, पण हे संपण्याची तारीख नक्की काय असेल? याचं उत्तर शोधण्यासाठी आम्ही कोणा ज्योतिषाला नाही, तर जगातील 4 सर्वात शक्तीशाली ‘AI’ चॅटबॉट्सना विचारलं आणि त्यांचे अंदाज ऐकून तुम्हीही डोकं खाजवाल…

सद्दामसारखं संपवायला आले अन् स्वतःच अडकले! जनरल जाफरींनी रचलेलं ते ‘चक्रव्यूह’ काय आहे?

इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे संपूर्ण जग चिंतेत आहे. हे युद्ध नेमके कधी संपणार आणि दोन्ही देश ‘सीजफायर’ (युद्धबंदी) कधी करणार? हा प्रश्न सर्वांना सतावतोय. त्यावर जगातील आघाडीचे 4 AI चॅटबॉट्स म्हणजेच ChatGPT, Grok, Gemini आणि Claude AI ला विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी रंजक आणि वेगवेगळे अंदाज वर्तवले आहेत. कोणी लष्करी तळांचा नाश होणे, तर कोणी राजकीय दबाव या आधारावर युद्धाच्या समाप्तीची तारीख सांगितली आहे.

1. Grok चा अंदाज 28 मार्च

एलॉन मस्कच्या ‘ग्रोक’ (Grok) नुसार, हे युद्ध 28 मार्चपर्यंत संपू शकते. यामागील तर्क देताना ग्रोकने म्हटले आहे की, ट्रम्प प्रशासनाने सुरुवातीपासूनच हे युद्ध 4 ते 5 आठवडे चालेल असा अंदाज लावला होता. 28 फेब्रुवारीला युद्धाला सुरुवात झाली, त्यानुसार जर, हिशोब केला तर, महिना पूर्ण होताना म्हणजेच 28 मार्चला युद्धबंदी होण्याचे संकेत अधिक आहेत.

2. ChatGPT चा अंदाज 1 एप्रिल

‘चॅटजीपीटी’ने 1 एप्रिल ही तारीख युद्धबंदीसाठी सुचवली आहे. इराणचा वेगाने संपत चाललेला शस्त्रास्त्रांचा साठा, अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांची भक्कम साथ आणि अमेरिकन सैन्याची आक्रमक कारवाई यामुळे एप्रिलच्या सुरुवातीलाच हे युद्ध थांबू शकते असा अंदाज चॅटजीपीटीने वर्तवला आहे. केवळ लष्करी ताकदच नाही, तर जागतिक राजकीय दबाव 1 एप्रिलला युद्धबंदीसाठी भाग पाडेल, असेही चॅटजीपीटीचे म्हटले आहे.

Strait of Hormuz : इराण-अमेरिका युद्धात होर्मुझची जगभर चर्चा! पण, ‘होर्मुझ’ नाव कसं पडलं? अर्थ काय?

3. Gemini चा अंदाज 4 एप्रिल

गुगलच्या ‘जेमिनी’ने ट्रम्प यांची विधाने आणि संरक्षण तज्ज्ञांच्या हवाल्याने युद्धविरामासाठी 4 एप्रिल ही तारीख वर्तवली आहे. जेमिनीच्या मते, अमेरिका तोपर्यंत थांबणार नाही जोपर्यंत इराणचे क्षेपणास्त्र निर्मिती केंद्र (Missile Production Center) पूर्णपणे नष्ट होत नाहीत. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 4 एप्रिलपर्यंतचा कालावधी लागू शकतो. तसेच, चर्चा फिसकटल्यास ही तारीख 15 एप्रिलपर्यंत पुढे जाऊ शकते असा अंदाज जेमिनीने वर्तवला आहे.

4. Claude AI चा अंदाज 20 एप्रिल

युद्ध पूर्णपणे थांबण्यासाठी ‘क्लाऊड एआय’ने सर्वात लांबचा म्हणजेच 20 एप्रिलचा अंदाज वर्तवला आहे. क्लाऊडच्या मते, सध्या दोन्ही देश चर्चेसाठी तयार नसले तरी पडद्यामागून वाटाघाटी सुरू आहेत. यावेळच्या युद्धाचे लक्ष्य केवळ अणुकार्यक्रम नसून ‘सत्ता बदल’ हे देखील असल्याने हे युद्ध किमान 6-7 आठवडे चालेल. त्यात रमझानचा महिना आणि तेलाच्या वाढत्या किमतींमुळे निर्माण होणारा जागतिक दबाव 20 एप्रिलपर्यंत युद्धबंदी घडवून आणू शकतो असा अंदाज क्लाऊड AI ने वर्तवला आहे.

एकूणचं काय तर, सर्वच आघाडीच्या एआय टूल्सनी मार्च अखेर ते एप्रिलचा उत्तरार्ध हा काळ युद्धाच्या समाप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे मानले आहे. आता प्रत्यक्षात कोणाची ‘भविष्यवाणी’ खरी ठरते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version