ISKCON defamation notice : इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस म्हणजेच इस्कॉनने (ISKCON) भारतीय जनता पक्षाच्या खासदार मनेका गांधी (Maneka Gandhi) यांना १०० कोटी रुपयांची मानहानीची नोटीस पाठवली आहे. मनेका गांधी यांनी या संस्थेवर गंभीर आरोप केले होते. इस्कॉनकडून गायींची कत्तलखान्यांना विक्री केले जाते, असं खळबळजनक विधान त्यांनी केलं हतो. त्यांनंतर इस्कॉनची ही नोटीस आली आहे.
नुकताच मनेका गांधी यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. यामध्ये त्यांनी इस्कॉन आपल्या गायी कसायांना विकते, असा गंभीर आरोप केला. मात्र, इस्कॉनने माजी केंद्रीय मंत्र्याचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
इस्कॉनने पाठवली नोटीस
इस्कॉन कोलकाताचे उपाध्यक्ष आणि प्रवक्ते राधारमण दास यांनी आज मनेका गांधी यांना नोटीस पाठवली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांनी सांगितले की, आज आम्ही इस्कॉनवर पूर्णपणे बिनबुडाचे आरोप केल्याबद्दल मनेका गांधी यांना 100 कोटी रुपयांची मानहानीची नोटीस पाठवली आहे. ते पुढे म्हणाले की, इस्कॉनचे भक्त, समर्थक आणि हितचिंतक यांचा जगभरातील समुदाय या बदनामीकारक, निंदनीय आणि दुर्भावनापूर्ण आरोपांमुळे अत्यंत दु:खी आहे. इस्कॉनविरोधातील खोट्या प्रचाराविरुद्ध न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडणान नाही, असं दास म्हणाले.
व्हायरल व्हिडिओनंतर नोटीस
भाजप खासदार मनोक गांधी यांच्या विरोधात कायदेशीर मानहानीची नोटीस सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आली आहे, ज्यामध्ये त्या असं म्हणताना ऐकू येत आहे की, इस्कॉन हे देशातले सर्वात मोठे विश्वासघातकी मंदिर आहे. ते गौशाला ठेवतात, त्याबदल्यात सरकारकडून बरेच फायदे मिळतात. मी अलीकडेच त्यांच्या अनंतपूर गौशाळेत गेले होते. तिथं एकही साधी गाय नव्हती. सर्व दुभत्या गायी होत्या.याचा अर्थ सगळे विकले. इस्कॉन आपल्या सर्व गायी कत्तलखान्यांन विकते. हेच रस्तोरस्ती हरे राम, हरे कृष्ण फिरत असतात. पण, यांनी जेवढ्या गायी खाटकांना विकल्या असतील, तेवढ्या अन्य कुणी विकल्या नसतील, असं त्या म्हणाल्या.
दरम्यान, इस्कॉन पाठवलेलल्या नोटीसीवर आता मनेका गांधी नेमकं काय पाऊल उचलतात, हेच पाहणं महत्वांचं आहे.