Israel Attack: इस्रायल-हमास युद्धात 27 भारतीय लोक जेरुसलेममध्ये अडकले

Israel-Palestine Conflict: इस्रायल आणि पॅलेस्टाईन (Israel-Palestine Conflict) यांच्यातील युद्धसदृश परिस्थितीमध्ये मेघालयातील 27 यात्रेकरू जेरुसलेममध्ये अडकले आहेत. मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा (Conrad Sangam) यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर ही माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या हँडलवरून लिहिले की, मेघालयातून पवित्र तीर्थक्षेत्र जेरुसलेम यात्रेसाठी गेलेले 27 नागरिक तिथे अडकले आहेत. त्यांच्या परतण्याबाबत मी परराष्ट्र मंत्रालयाच्या […]

Israel Hamas War : इस्त्रायलने धमकावताच 'हमास'ची माघार; 'त्या' लोकांसाठी घेतला मोठा निर्णय

Israel Hamas War : इस्त्रायलने धमकावताच 'हमास'ची माघार; 'त्या' लोकांसाठी घेतला मोठा निर्णय

Israel-Palestine Conflict: इस्रायल आणि पॅलेस्टाईन (Israel-Palestine Conflict) यांच्यातील युद्धसदृश परिस्थितीमध्ये मेघालयातील 27 यात्रेकरू जेरुसलेममध्ये अडकले आहेत. मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा (Conrad Sangam) यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर ही माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या हँडलवरून लिहिले की, मेघालयातून पवित्र तीर्थक्षेत्र जेरुसलेम यात्रेसाठी गेलेले 27 नागरिक तिथे अडकले आहेत. त्यांच्या परतण्याबाबत मी परराष्ट्र मंत्रालयाच्या संपर्कात आहे.

मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी लिहिले आहे की, मेघालयातील 27 लोक बेथलेहेम शहरात अडकले आहेत. हे सर्व नागरिक काही दिवसांपूर्वी मेघालयातून पवित्र तीर्थक्षेत्र जेरुसलेमच्या दर्शनासाठी गेले होते. ट्विट करताना मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला विनंती केली आहे.

यापूर्वी, इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष सुरू झाल्यानंतर पॅलेस्टाईनसोबत वाढलेल्या तणावानंतर भारतीय दूतावासाने एक सूचना जारी केला होता. यामध्ये भारतीयांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलच्या दक्षिण भागात युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या संघर्षात अनेकांचा मृत्यूही झाला आहे. हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलने गाझा पट्टीतील हमासच्या ठाण्यांवर हल्ले केले आहेत. यासोबतच पॅलेस्टाईनसोबत युद्धाची घोषणा करण्यात आली आहे.

इस्रायलमध्ये 4 प्रमुख प्रदेश
जेरुसलेमला हिब्रूमध्ये येरुशलेम आणि अरबीमध्ये अल-कुड्स म्हणतात. याला जेरुसलेम असेही म्हणतात. इस्रायलमध्ये 4 प्रमुख प्रदेश आहेत. यामध्ये तेल अवीव, जेरुसलेम, हैफा आणि बेर शेव यांचा समावेश आहे. जेरुसलेम हे इस्रायलचे सर्वात मोठे शहर आहे.

पंतप्रधान मोदींनी दुख: व्यक्त केले
पीएम मोदींनी सोशल मीडिया X वर लिहिले की, “इस्रायलमधील दहशतवादी हल्ल्याच्या बातमीने खूप धक्का बसला. आमच्या प्रार्थना निष्पाप पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत. या कठीण काळात आम्ही इस्रायलच्या पाठीशी उभे आहोत.

Exit mobile version