Download App

Israel Embassy परिसरात स्फोट; दिल्लीमध्ये खळबळ, पोलिसांकडून तपास सुरू

  • Written By: Last Updated:

Israel Embassy : दिल्लीतील इस्त्रायली दुतावास (Israel Embassy) असलेल्या चाणक्य पुरी भागामध्ये दुतावासच्या मागे स्फोट झाल्याचे बातमी समोर आली आहे. त्यामुळे या भागामध्ये खळबळ माजली असून या संदर्भात दिल्ली पोलिसांनी तपास सुरू केला आहे. संध्याकाळी पाच वाजेच्या दरम्यान इस्रायली दुतावासाच्या आसपास स्पोर्ट झाल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी सुरक्षा दलाला मिळाली.

मोठी बातमी; नवाब मलिक अचानक अजितदादांच्या भेटीला, ‘देवगिरी’वर खलबतं

या संदर्भात दिल्ली फायर सर्विसेस चे प्रमुख अतुल गर्ग यांनी सांगितलं की, आतापर्यंत या घटनास्थळी काहीही मिळालेले नाही. मात्र या परिसरामध्ये फाडून टाकलेले कागदाचे तुकडे पडलेले मिळाले आहेत. तर या घटनास्थळी असलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, संध्याकाळी पाच वाजता तो इजरायली दुतावासाच्या ड्युटीवर कार्यरत होता. त्यावेळी एक आवाज आला. हा आवाज गाडीचा टायर फुटल्यासारखा होता. गेटच्या बाहेर पहिला असता. त्यावेळी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दूर दिसत होता. हा आवाज देखील खूप मोठा होता. अशी माहिती या व्यक्तीने दिले आहे.

Shirur Loksabha अजितदादांकडे गेल्यास आढळरावही अजितदादांच्या गटात जाणार? म्हणाले चर्चेला अजून…

दुतावासाच्या परिसरातील एका मोकळ्या प्लॉटवर हा स्फोट झाल्याचं इस्त्रायली दूतावासाकडून देखील सांगण्यात येत आहे. मात्र पोलिसांना या ठिकाणी नेमका कोणत्या गोष्टीचा स्फोट झाला. याची स्पष्ट माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन युद्धादरम्यान अशा प्रकारे इस्त्रायली दुतावासाबाहेर अशा प्रकारे स्फोट झाल्याचं कळाल्याने खळबळ निर्माण झाली आहे.

Tags

follow us