इस्त्रायली सैन्याने खान युनिसचा घेतला ताबा; गोळीबाराचं सत्र कायम, मृतांची संख्या 18 हजारांवर
Israel-Hamas war : इस्त्रायली सैन्य आता गाझा पट्टीच्या दक्षिण भागातील खान युनिस ताब्यात घेण्याच्या तयारीत आहे. इस्त्रायली सैन्याचे (Israel-Hamas war) रणगाडे खान युनिसच्या मध्यभागी पोहोचले असून लष्करी कारवाया सुरु झाल्या आहेत. हमास अतिरेकी संघटनेचा या भागांत प्रभाव असून रात्रंदिवस लढाई सुरु असल्याची परिस्थिती आहे. गोळीबारात आत्तापर्यंत हमासच्या 18 हजार लोकांचा बळी गेला आहे.
‘मराठा आरक्षणासाठी राजीनामा देईन’; जाळपोळनंतर प्रकाश सोळंकेंनी दिला शब्द
गाझामधील अनेक ठिकाणी इस्रायली सैन्याने शाळा आणि मशिदींवर हल्ले केले असून हमासने शाळा आणि मशिदींमध्ये आपले तळ उभारले आहेत. तळ उभारुन बोगद्यांचे जाळे तयार केले असून या इस्रायली लष्कराच्या दाव्याला यामुळे बळ मिळत आहे. हमासचे सैन्य लोकवस्तीच्या भागात ठिकाणे बदलून इस्रायली सैनिकांवर हल्ले करत आहेत. त्यामुळे इस्त्रायली सैन्याला त्यांना घेरण्यात अडचण येत आहे. पण ज्या भागात लढाऊ सैनिकांचे कायमचे तळ आहेत, त्या भागात इस्रायली लष्कर त्यांना रणगाडे आणि हवाई हल्ले करून लक्ष्य करत आहेत.
बसपाचा नवा ‘बॉस’ ठरला! लोकसभा निवडणुकीपूर्वी मायावतींकडून उत्तराधिकाऱ्याची घोषणा
खान युनिस शहरात सुरू असलेल्या भीषण लढाईमुळे शहरात धुराचे लोट पसरत असल्याचं दिसून येत आहेत. तसेच उत्तर गाझा येथील जबलिया निर्वासित छावणी परिसरात भीषण लढाई सुरू असून एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या या भागावर हमासचाही बराच प्रभाव आहे. मैदानावरील खडतर स्पर्धेमुळे गाझामध्ये आतापर्यंत इस्रायली लष्कराचे 97 सैनिक मारले गेले आहेत. तर इस्त्रायली सैन्याच्या हल्ल्यात गाझामध्ये आतापर्यंत सुमारे 18 हजार लोक मारले गेले आहेत.
Gaudbangal word : गौडबंगाल म्हणजे काय? समजून घ्या | LetsUpp Marathi
गाझा शहरातून खान युनूस येथे पळून गेलेल्या चार मुलांच्या वडिलांनी आपली ओळख गोपनीय ठेवताना सांगितले की, सैन्यांनी उंच इमारतींवर ठाण मांडले असून ते दूरवरून इस्रायली सैनिकांना लक्ष्य करत आहेत. खान युनिसमध्ये बहुतेक इस्रायली ओलीस ठेवण्यात आल्याचे समजते. यामुळे इस्रायली लष्कराच्या स्पेशल फोर्स बटालियनचे कमांडो ओलिसांच्या शोधासाठी शहरात छापे टाकत आहेत. एका ठिकाणी छापेमारी करताना हमासच्या सैनिकांना घेरल्याने पाच इस्रायली सैनिक ठार झाले आहेत.
Suhana Khan : चित्रपटांमध्ये येण्याआधीच सुहाना खान आहे कोट्यवधींची मालकीण…
सध्या 138 इस्रायली हमासच्या ताब्यात असल्याचा अंदाज आहे. आठवडाभर चाललेल्या युद्धविराम दरम्यान दोन करारांतर्गत हमासने एकूण 105 ओलिसांची सुटका केली. यापैकी 81 इस्रायलचे, 23 थायलंडचे आणि एक फिलिपिन्सचे नागरिक होते.